आलिशान मोटारींची जर्मन निर्माता बीएमडब्ल्यूने बुधवारी आपल्या नवीन ‘अ‍ॅक्टिव्ह हायब्रीड ७’ या तब्बल १.३५ कोटी रुपये किमतीची (एक्स-शोरूम दिल्ली) ही कार भारतात दाखल केली. भारतीयांना आजवर अनुभवलेली नाही अशी अद्वितीय चालक अनुभूती या नव्या सेदानकडून मिळविता येईल, असे तिच्याबद्दल गौरवोद्गार काढताना बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष फिलिप वॉन सार यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक मोटर आणि पेट्रोल इंजिन असा अनोखा संकर असलेल्या या मोटारीत लिथियम आयन बॅटरीवर चालणारी अंतर्गत प्रणाली असून, प्रवाशांच्या ऐषारामासाठी बॅक रेस्ट, फोल्डिंग टेबल, मसाज अशा अनेक नव्या वैशिष्टय़ांचा यात समावेश केला गेला आहे.