जागतिक भांडवली बाजारातील घसरणीपायी २६ हजारांखाली रोडावलेला सेन्सेक्स शुक्रवारी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालाच्या आशावादाने पुन्हा उंचावला. राज्यात भाजपाला बहुमत मिळण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदीचा जोर लावत मुंबई निर्देशांकात शतकी भर घातली.
१०९.१९ अंश वधारणेसह सेन्सेक्स २६,१०८.५३ वर ३१.५० अंश वाढीसह ७,७७९.७० वर पोहोचला. सेन्सेक्सने गुरुवारी एकाच व्यवहारात जवळपास ४०० अंशांने कोसळला होता. तर निफ्टीने ७,७५० चाही स्तर सोडला होता. शुक्रवारी निफ्टीचा प्रवास ७,८१९.२० ते ७,७२३.८५ दरम्यान राहिला.
रुपया सावरला
डॉलरच्या तुलनेत ६२ पर्यंत पोहोचणारा रुपया सप्ताहअखेर काहीसा उंचावला. गेल्या सलग दोन सत्रातील घसरणीमुळे स्थानिक चलन ६१.८३ अशा गेल्या सात महिन्यांतील नीचांकापर्यंत गेले होते. शुक्रवारी त्यात ३९ पैशांची भर पडत चलन ६१.४४ पर्यंत उंचावले. याचबरोबर गेल्या दोन व्यवहारातील घसरण रोखली गेली. यापूर्वीच्या दोन्ही दिवसांतील त्यातील नरमाई ७३ पैशांची होती.