मोबाइलद्वारे पसे भरणे किंवा खरेदी करण्याच्या क्षेत्रात आमुलाग्र बदलघडविणारे पेझअ‍ॅप एचडीएफसी बँकेने सादर केले आहे.
हे अ‍ॅप डाऊनलोड करून सर्वप्रकारच्या खरेदीसाठी एका क्लिकवर पसे भरणे, मोबाइल रिचार्जपासून पसे हस्तांतरित करण्यापर्यंत तसेच बिल भरण्यापासून ते किराणा सामान खरेदीपर्यंत किंवा परदेशी पर्यटन पॅकेज बुकींग व चित्रपट तिकीटांची खरेदी यासारखी मोठी खरेदीही यामाध्यमातून करता येते.
पेझअ‍ॅपच्यामध्ये स्मार्टबाय – अर्थात मोठी व्हच्र्युअल बाजारपेठ आहे. यामध्ये सर्वप्रकारची उत्पादने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दैनंदिन गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तूंपासून सर्व वस्तू मॉलप्रमाणे उपलब्धतता यात आहे.
पेझअ‍ॅप आणि स्मार्टबाय सादर करणे हे एचडीएफसी बँकेच्या डिजिटल बँकिंग उपक्रमातील अद्ययावत गोष्टी असल्याचे यानिमित्ताने बँकेने स्पष्ट केले आहे. यात बँकिंगची ताकद ग्राहकांच्या हातात देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या सादरीकरणाविषयी बँकेच्या कार्डए पेमेंट प्रोडक्ट आणि र्मचट अक्वायरींग सेवा विभागाचे प्रमुख पराग राव म्हणाले की, हे अ‍ॅप हा वित्त सेवा क्षेत्रातील एक अभिनव मार्ग आहे. मोबाइलवर जग केंद्रित झालेल्या ग्राहकांसाठी हे संशोधन म्हणजे ते सर्व प्रकारचे व्यवहार आणि खरेदी या एकट्या अ‍ॅपद्वारे केवळ एका पिनद्वारे त्यांना हवे तेव्हा हवे तिथे आगाऊ भरणा किंवा पुनर्भरणा करण्याची चिंता न बाळता करू शकतील. आमच्या इतर सर्व संशोधनांप्रमाणे ग्राहकांची सुलभता हेच यामागील उद्दिष्ट आहे. ‘बँक आपकी मुठ्ठी मं’ या आमच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून डिजिटल क्षेत्रात आणखी मोठी झेप घेतली आहे. किंबहुना ग्राहक याकडे केवळ बँकिंग ताकद म्हणून न पाहता संपूर्ण जग म्हणून याकडे पाहतील.
गेल्या आíथक वर्षांत एचडीएफसी बँकेच्या एकूण व्यवहारांपकी ६३ टक्के व्यवहार डिजिटल माध्यमातून झाले होते. मोबाइल पेमेंटमुळे व्यवहार रखडून होणारे अडथळे या अ‍ॅपमुळे कमी होणार असल्याने व्यावसायिकांसाठी ही संधी असल्याचे मानले जाते.