परदेशात काळा पैसा नेमका किती आहे याबद्दल कोणालाच काही नक्की माहित नाही, असे विधान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी केले. प्राप्तिकर संदर्भात आजोयित करण्यात आलेल्या एका बैठकीदरम्यान ते बोलत होते.
परदेशात जाणारा काळा पैसा थांबवण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून, यासाठी प्राप्तिकराचे नियोजन करायला हवे. परदेशामध्ये काळा पैसा किती आहे, याबाबत नक्की आकडा कोणीच सांगू शकत नाही. अनेकजण वेगवेगळे अंदाज बांधत आहेत, असेही ते पुढे म्हणाले. परदेशातील खात्यांमध्ये जाणारा पैसा थांबविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात यावर बोलताना, काळा पैसा थांबविण्यासाठी आपल्याला यंत्रणेत सुधारणा करणे गरजेचे आहे. पॅन कार्ड व आधार कार्डचा वापर करणे बंधनकारक केल्यास सुधारणा होऊ शकते, असे मत राजन यांनी यावेळी नोंदविले.