किश्तवाडमध्ये २०१३ मध्ये झालेल्या जातीय दंगलीप्रकरणी जम्मू आणि काश्मीरचे माजी मंत्री सज्जाद अहमद किचलू यांच्या अटकेची मागणी भाजप व पीडीपीने केली आहे. किचलू हे ओमर अब्दुल्ला मंत्रिमंडळात होते. मात्र दंगलीशी संबंध जोडला गेल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते.
या दंगलीची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती गांधी आयोगाने किचलू यांच्यासह जम्मूचे तत्कालीन पोलीस महासंचालक राजेश कुमार, किश्तवाडचे वरिष्ठ अधिकारी अशकुर वणी व माजी उपायुक्त मोहम्मद सलीम यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे भाजप, पीडीपी आमदारांनी सांगत विधानसभेत गदारोळ केला. सरकारने या अहवालाचा अभ्यास केला नसल्याचे संसदीय कामकाज व कायदामंत्री बशारत अहमद बुखारी यांनी स्पष्ट केले. हा अहवाल आम्हाला मिळाला असून त्याचा अभ्यास केला नसल्याचे बुखारी यांनी सभागृहात स्पष्ट केले. केवळ एकाच व्यक्तीला दोषी ठरवणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य अकबर लोन यांनी स्पष्ट केले.