अवकाळी पाऊस व गारपिटीने अनेक राज्यांत पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, केंद्र सरकार हे राज्य सरकारांच्या समवेत नुकसानभरपाई मर्यादा वाढवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहे.
पंतप्रधानांना शेतकऱ्याचे जे नुकसान झाले त्याची जाणीव आहे. त्यासाठी अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम वाढवून मिळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  देशभरात पिकांचे, गुरांचे जे नुकसान झाले आहे त्यात मदत करण्याची जबाबदारी सरकार पार पाडेल असे राजस्थानमधील तिमेली या खेडय़ात शेतकऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या भागातील अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त भागांना भेट देण्यास सांगितले असून, राज्य सरकारांच्या समन्वयाने शेतकऱ्यांना मदत केली जाईल. अर्थमंत्र्यांनी मुकुट मीणा या शेतकऱ्याच्या घरी जाऊन नुकसानीची माहिती घेतली. गारपिटीत हात गमावलेल्या एका पाच वर्षांच्या मुलाशीही ते बोलले. एक बिघा जमिनीसाठी १२००० रुपये व हेक्टरमागे ७० हजार रुपये भरपाई देण्याची मागणी काँग्रेसचे बुंदी जिल्हाध्यक्ष सी. एल. प्रेमी यांनी केली.
शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम वाढवून मिळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  देशभरात पिकांचे, गुरांचे जे नुकसान झाले आहे त्यात मदत करण्याची जबाबदारी सरकार पार पाडेल