तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी द्रमुकचे नेते एम. के. स्टालिन यांच्याविरुद्ध बुधवारी फौजदारी स्वरूपाचा बदनामीचा खटला दाखल केला आहे. स्टालिन यांनी विधानसभेबाहेर आपल्याविरुद्ध आणि अध्यक्षांविरुद्ध घोषणाबाजी केल्याचा आरोप जयललिता यांनी केला आहे.मुख्यमंत्र्यांच्या वतीने सरकारी वकील एम. एल. जगन यांनी चेन्नईच्या प्रधान सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. स्टालिन यांच्यासह द्रमुकच्या आमदारांना २२ जुलै रोजी सभागृहातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर स्टालिन यांनी वार्ताहरांशी विधानसभेबाहेर बातचीत केली अणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांविरुद्ध घोषणाबाजी केली, असे याचिकेत म्हटले आहे.