बेळगाव जिल्ह्य़ात मराठी भाषक लोकांवर पोलिसांनी जे अत्याचार केले त्याच्याविरोधात बुधवारी शिवसेना सदस्यांनी लोकसभेत गोंधळ घातला. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास विस्कळीत झाला. बेळगाव जिल्हा केंद्रशासित जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच शिवसेनेचे सदस्य हौद्यात जमले, त्यांनी कर्नाटक सरकारने बेळगाव येथे पोलिसांनी केलेल्या अत्याचाराच्या विरोधात घोषणा दिल्या, जखमींची वृत्तपत्रांतील छायाचित्रे सेना सदस्यांनी दाखवली.शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला.
‘विरोधी पक्षनेतेपदाचा
निर्णय चार दिवसांत ’
लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांबाबत अ‍ॅटर्नी जनरलनी दिलेला अभिप्राय आणि नियम यांचा विचार केल्यानंतर येत्या चार दिवसांत त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी बुधवारी स्पष्ट केले.