पोपट अनेकदा आपल्या बोलण्याची नक्कल करून हुबेहूब आवाज काढतो पण पोपटासारखा पक्षी असे कसे करू शकत असेल याचे कारण पुरेसे सापडलेले नाही. आताच्या संशोधनानुसार पोपटाचा मेंदू हा वेगळ्या रचनेचा असतो व तो सुरेल गाणारे पक्षी व हमिंगबर्ड पेक्षाही वेगळा असते, भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात असे दिसले आहे, की पोपटाच्या मेंदूत फार फरक असतो त्यामुळे तो आपल्या बोलण्याची नक्कल करणारे आवाज काढू शकतो. गेल्या चौतीस वर्षांत पोपटाचा अभ्यास बराच झाला असला, तरी त्याच्या मेंदूवर संशोधन झाले नव्हते. त्याच्यातील जनुक आविष्करणाचाही अभ्यास आता करण्यात आला आहे. त्याचा मेंदू हमिंगबर्ड व इतर गाणाऱ्या पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे. त्याच्या मेंदूतील ‘शेल’ हा भाग आकाराने मोठा आहे त्यामुळे तो माणसाच्या आवाजाची नक्कल करू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
डय़ुक विद्यापीठ व हॉवर्ड ह्य़ूजेस मेडिकल इन्स्टिटय़ूट येथील संशोधक एरिक जार्विस व त्यांच्या प्रयोगशाळेतील विद्यार्थिनी मुक्ता चक्रवर्ती यांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या मते पोपट त्यांना मिळणाऱ्या माहितीचे संस्करण कसे करतात यावर या संशोधनातून प्रकाश पडणार आहे; शिवाय विशिष्ट आवाजांची ते नक्कल का व कशी करतात हेही समजणार आहे. पोपट हा असा पक्षी आहे जो आवाज शिकू शकतो किंबहुना त्याची नक्कल करू शकतो, काही पक्षी अशी नक्कल इतरांपेक्षा जास्त चांगली कशी करू शकतात हा संशोधनाचा विषय आहे. पोपटाच्या मेंदूतील काही भागांचा आकार वेगळा आहे व त्याशिवाय कुठले स्पष्टीकरण तूर्त तरी दिसत नाही. आता पर्यंत पोपटातील बजगेरिगर ही प्रजात माणसाच्या आवाजाची नक्कल कशी करते याचा अभ्यास करण्यात आला होता. डेन्मार्क व नेदरलँड्समधील संशोधकांनी या संशोधनासाठी आवश्यक पोपटाच्या मेंदूतील ऊती दिल्या आहेत. त्यातून आठ प्रजातींच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला. कॉन्युरेस, कॉकटियल्स, लव्हबर्ड्स, अ‍ॅमझॉनमधील सोनेरी व निळा पोपट, मकाव व किया तसेच आफ्रिकेतील राखाडी पोपट यांचा अभ्यास या वेळी करण्यात आला आहे. या पोपटांच्या आठ प्रजातींच्या अभ्यासात जनुक खुणा मेंदूत विशिष्ट क्रिया घडवून आणतात म्हणून हे पक्षी माणसाची नक्कल करू शकतात. त्यांच्यातील जनुक आविष्करणही वेगळे असते. न्यूझीलंडमधील पोपटाची किया नावाची एक प्रजात आहे, तिच्यातील शेल नावाचा भाग मोठा असतो. त्यातील न्यूरॉन्सची संख्या शेल्स या भागात गेल्या २९ दशलक्ष वर्षांनंतर खूप वाढली आहे. या शेल्स नावाच्या भागामुळे पोपट माणसाच्या बोलण्याची नक्कल करू शकतात, असा प्राथमिक अंदाज करण्यात आला आहे.

पोपट मिठू मिठू का बोलतो..
पोपटाच्या मेंदूचा अभ्यास आतापर्यंत झाला नव्हता. पोपटाच्या आठ प्रजातींचा अभ्यास केला असता त्याच्या मेंदूत शेल व कोअर असे दोन भाग आढळतात. ही रचना इतर पक्षाच्या मानाने वेगळी असल्याने तसेच जनुकांचे आविष्करण वेगळे असल्याने पोपट माणसाच्या बोलण्याची नक्कल करतात,असे भारतीय वैज्ञानिक मुक्ता चक्रवर्ती व एरिक जार्विस यांचे मत आहे. बर्ड टेन के या प्रकल्पात १० हजार पक्ष्यांच्या प्रजातींचा जनुकीय आराखडा तयार केला जात आहे. त्यातील संशोधनाचा हा काही भाग आहे.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक