डावखुऱ्या शैलीदार फलंदाजीने क्रिकेट जगताना मोहिनी घालणारा श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुमार संगकाराला यंदाच्या सीएट सर्वोत्तम क्रिकेटपटू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचप्रमाणे २०१४-१५ वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २६४ धावा झळकावणारा भारताचा फलंदाज रोहित शर्माला या वेळी विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. सातत्याने धावांची टांकसाळ उघडून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अजिंक्य रहाणेला या वेळी सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू हा पुरस्कार देण्यात आला.
श्रीलंकेने या वर्षी दमदार कामगिरी केली. त्यांनी इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत इतिहास रचला, त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानलाही पराभूत केले. या वर्षभरात आठ कसोटी सामन्यांमध्ये १,०५२ धावा संगकाराने केल्या आहेत, त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ३५ सामन्यांमध्ये सात शतकांच्या जोरावर १,७५४ धावा फटकावल्या. या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर त्याला सर्वोत्तम क्रिकेटपटू हा बहुमान देण्यात आला. रोहितने या वर्षांत दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करताना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधील २६४ अशी सर्वोत्तम धावसंख्या रचली, दोनदा द्विशतक झळकावणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरल्याने त्याला विशेष पुरस्कार देण्यात आला. वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डला या वेळी लोकप्रिय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला.

दुखापतीनंतर हा सामना खेळत असताना फक्त सर्वोत्तम कामगिरी करायची, हाच विचार माझ्या मनात होता. माझ्याकडून नेत्रदीपक कामगिरी झाली आणि मला दुसऱ्यांदा द्विशतकाला गवसणी घालता आली. या खेळीचा मी सर्वात जास्त आनंद लुटला. सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला काहीही शाश्वत नाही. आयपीएलचे जेतेपद जिंकल्याचा आनंद काही औरच आहे. सर्वोत्तम सांघिक कामगिरीमुळे आम्हाला जेतेपदाला गवसणी घालता आली. सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग यांच्या अनुभवाचा आम्हाला चांगलाच फायदा झाला.
रोहित शर्मा</p>

क्रिकेटमध्ये आनंद शोधता येतो, त्यामुळेच मी या खेळाकडे वळू शकलो. सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर संघाला विजय मिळवून द्यायचा हेच माझे लक्ष्य असते. यामध्ये काही चुकाही होतात, पण त्या जाणूनबुजून होत नाहीत तर खेळाच्या प्रवाहामध्ये होतात. संघाला संतुलित कसे करता येईल, यावर माझा नेहमीच भर असतो. मला ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून जास्त आनंद मिळतो, त्यामुळेच या क्रिकेटच्या प्रकारात माझी कामगिरी लक्षणीय ठरते.
किरॉन पोलार्ड

sachin tendulkar finance marathi news
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू की कलाकार?
Tom Latham believes that Test cricket is the most important sport news
कसोटी क्रिकेटच सर्वांत महत्त्वाचे टॉम लॅथम
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: मयंक यादवने स्वतःचाच विक्रम मोडला, आयपीएलमधील वेगवान गोलंदाजांच्या यादीत मिळवले स्थान
Virat Kohli breaks Gayle's record
KKR vs RCB : किंग कोहलीने मोडला धोनी आणि गिलचा ‘विराट’ विक्रम! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा फलंदाज

कर्नाटकला दुसऱ्यांदा रणजीचे जेतेपद मिळवून देऊ शकलो, याचा आनंद आहे. संघामध्ये चांगला समन्वय असून अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला पाठिंबा नेहमीच मला मिळतो. मुंबई इंडियन्सच्या जेतेपदाचा आनंद नक्कीच आहे. स्पर्धेत खेळताना प्रत्येकाला आपली जबाबदारी चोख माहिती होती. त्यामुळे आमचा संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नव्हता. माझ्या मते हेच आमच्या विजयाचे गमक आहे.
विनय कुमार

सीएट पुरस्कार विजेते
सर्वोत्तम क्रिकेटपटू : कुमार संगकारा
विशेष पुरस्कार : रोहित शर्मा
सर्वोत्तम फलंदाज : हशिम अमला
सर्वोत्तम गोलंदाज : रंगना हेराथ
सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटू : ड्वेन ब्राव्हो
लोकप्रिय क्रिकेटपटू : किरॉन पोलार्ड
सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू : अजिंक्य रहाणे</span>
सर्वोत्तम स्थानिक क्रिकेटपटू : विनय कुमार
सर्वोत्तम युवा क्रिकेटपटू : दीपक हुडा