वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात श्रीलंकेला जेतेपद पटकावून दिले आणि या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आहे. ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून दिनेश चंडिमलला वगळले असून मलिंगा हा संघाचा नवा कर्णधार असेल, तर लहिरू थिरीमानेला संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
ट्वेन्टी-२० विश्वचषकात चंडिमलच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ खेळत होता, पण अखेरच्या तीन सामन्यांसाठी संघात मोठे फेरबदल झाले.