lp13जागतिकीकरणानंतरच्या काळात वाढलेल्या संधींनी ऐहिक समृद्धीची चाहूल दिली असली तरी त्याच वेळी बदललेल्या जीवनशैलीने अनेक विकारांची धोक्याची घंटादेखील वाजवली आहे.

वय वर्षे ३५, मोठय़ा कंपनीतली नोकरी, भरपूर पगार, फ्लॅट, गाडी असा राहणीमानाचा चढता आलेख आणि एके दिवशी अचानक त्याचा हृदयविकाराने मृत्यू.
वय वर्षे ३८, आयटी कंपनीतील नोकरी, खच्चून काम आणि भरपूर पगार, वयाची चाळिशी ओलांडली आणि जेवणाऐवजी औषधांच्या गोळ्यांचंच जेवण.
कोणत्याही मध्यमवर्गीय घरातील दृश्य, कामावरून घरी आलेले वडील, केवळ टॉवेल जागेवर नाही म्हणून चिडचिड, राग, भांडण आणि परिणामी मुलांवर होणारा..

Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

गेल्या काही वर्षांतील आपल्या आजूबाजूस आढळणारी ही उदाहरणं. आपल्या आरोग्याचे हे बदलते रूप. खरं तर बदल हा सृष्टीचा नियम. जे बदलत नाही ते नष्ट होणार; पण आजचा हा बदल नेमकं काय सुचवतो? नेमकं सांगायचं तर जागतिकीकरणानंतर संधी वाढू लागल्या तसतसं करिअरच्या संकल्पना बदलू लागल्या, पगाराचे आकडे बदलू लागले, जगण्याच्या तऱ्हा बदलत गेल्या, कामाच्या पद्धती, खाण्याच्या सवयी, वागण्याची पद्धत सारं बदलू लागलं. एका नव्या जीवनशैलीनेच आपला ताबा घेतला.
अर्थात या साऱ्या बदलाचे फायदे होत आहेत तसेच काही तोटेदेखील आहेत. आज आपण या संपूर्ण चक्रात पुरते अडकलो आहोत. त्याला दुष्टचक्र म्हणायचे की प्रगती यावर वादचर्चा होतच राहणार; पण एका परीने आज आपली अपरिहार्यता झाली आहे. अधिक चांगलं जगण्यासाठी अधिक पैसे हवेत, अधिक पैसे हवेत म्हणून अधिक काम, अधिक काम म्हटले की अधिक ताण, कमी वेळ. मग जे जे रेडीमेड मिळेल त्याचा स्वीकार आणि परिणामी जीवनशैलीतला बदल. या साऱ्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या घटकांच्या संयुगातूनच मग वर सांगितलेली उदाहरणे रोजची होतात. हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, लठ्ठपणा, पोटाचे विकार, दाताचे, डोळ्यांचे आजार बळावतात. हे आजार आपल्याकडे नव्हते अशातला भाग नाही. मुद्दा आहे तो त्यांनी आपल्या समाजाचा ताबा ज्या वेगाने आणि ज्या वयोगटाचा घ्यायला सुरुवात केली आहे तो चिंतेचा भाग आहे. पन्नाशी-साठीनंतर उद्भवणाऱ्या आजारांना आज तिशी-चाळिशीतील अनेकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी ‘लाइफस्टाइल डीसीज’ असा गोंडस शब्द वापरला जात असल्यामुळे अनेकांना आपण या हायफाय आजारांपासून लांब आहोत असेच वाटते; किंबहुना ही श्रीमंतांची थेरं असं म्हणून स्वत:भोवती एक तटबंदी तयार करण्याकडेच अनेकांचा कल दिसून येतो; पण गेल्या काही वर्षांत आरोग्य क्षेत्रातील या घडामोडींची दखल अनेक स्तरांवरून घेतली जात आहे. प्राइस वॉटर कूपरच्या एका अहवालानुसार जीवनशैलीतील बदलांमुळे उद्भवणाऱ्या आजारांपोटी २०१५ अखेर दोनशे बिलियन डॉलर्स खर्च होतील, तर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एका सर्वेक्षणानुसार देशातील शहरी भागातील मधुमेहींची २००५ सालातील संख्या २० दशलक्षवरून २०१५ साली ३३ दशलक्षवर पोहोचलेली असेल, तर हृदयरोगींची संख्या १८ दशलक्षवरून ३५ दशलक्षवर जाण्याची शक्यता आहे. साहजिकच या लाइफस्टाइलची दखल घेणे भाग पडते.
आजच्या स्पर्धेच्या युगात नेमकी याची पाळंमुळं शोधताना ज्येष्ठ हृदयविकारतज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी सांगतात की, हे सारं काही घडतंय ते आपल्या आचारविचार, आहारविहारावरील गमावलेल्या नियंत्रणामुळे. जीवनशैलीच्या बदलामुळे निर्माण होणारे भावनिक, मानसिक, आर्थिक आणि शारीरिक तणाव हे हृदयरोगाच्या मुळाशी असल्याचे ते नमूद करतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान यांचा तणावाशी थेट संबंध आहे. महत्त्वाचं म्हणजे हे तीनही प्रकार घरीदारी सर्वत्र तुमच्याबरोबर असतात. या तणावामुळे कॉर्टिसॉल हॉर्मोन्समार्फत अॅड्रिनॅलिन व नॉन-अॅड्रिनॅलिन हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स शरीरासाठी घातक असतात; पण तणाव वाढेल तसे हे हार्मोन्स तयार होणेदेखील वाढते आणि शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात, हेच हृदयरोगाला आमंत्रण असते. हृदयविकाराचा विळखा घालणारे अनेक घटक आज समाजात कार्यरत आहेत. त्यापासून चार हात दूर राहायचं असेल, तर आचार-विचार, आहार-विहार सुधारणं हाच योग्य पर्याय असल्याचं डॉ. गजानन रत्नपारखी सांगतात. या चार घटकांचं पालन कसं करता यावरच आपण हृदयरोगाच्या जवळ जाणार, की दूर हे ठरतं. किमान सहा-सात तास शांत झोप, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आणि व्यसनांपासून चार हात दूर राहिला तरी हृदयविकाराला तुम्ही रोखू शकता. इतकंच नाही तर किमान झोप घेतली तरी खूप काही गोष्टी आपोआप टळतात यावर ते भर देतात.
ताणतणावाचा दुसरा महत्त्वाचा परिणाम होत आहे तो रक्तदाबावर. डॉ. पराग देशपांडे सांगतात की, गेल्या काही वर्षांत उच्च रक्तदाबाचा विकार वाढतो आहे. नोकरी मिळविण्यापासून ते टिकविण्यासाठी स्पर्धा वाढली असल्यामुळे, लहान वयातच उच्च रक्तदाबाला आमंत्रण मिळत आहे. तर दुसरीकडे उत्पादन क्षेत्र कमी होऊन सेवा क्षेत्रातील नोकऱ्या वाढल्या आहेत. त्यातही आयटी, बीपीओसारख्या नोक ऱ्यांमध्ये तरुण मोठय़ा प्रमाणात आहेत. कॅन्टीन फूड, सेवा क्षेत्रातील सततच बैठं काम यामुळे निद्रानाश, वारंवार छातीत दुखणं, पॅनिक होणं, ताणतणाव वाढणं अशा विकारांचा उद्भव वाढला आहे. त्याचबरोबर कामाच्या कार्यक्षमतेवर पगार हे गणित असल्यामुळे साहजिकच आपलं आयुष्य आता प्रेशर कुकरप्रमाणे झालं आहे. कुकरची शिट्टी कशी करायची हे ज्याचं त्यानंच ठरवलं पाहिजे. त्याचं उत्तर आपल्याकडे असतंच, कोणाला गाणं ऐकून शांतता लाभेल, कोणाला गप्पा मारून. शिट्टी करण्याचे हे अनेक पर्याय आहेत, आपण आपला मार्ग निवडणं गरजेचं आहे. सततचं बैठं काम आणि व्यायामाचा अभाव आणि जोडीला खाण्याचा असमतोल याचा परिणाम उच्च कोलेस्टेरॉलमध्ये परिवर्तित होत आहे, तर व्यायामाला वेळच नाही अशी सबब अनेकांकडून ऐकायला मिळते. त्यावर डॉ. देशपांडे सांगतात की, किमान रोज कार्यालयातून घरी येताना तरी स्टेशन ते घर यासाठी वाहनापेक्षा चालण्याचा पर्याय स्वीकारावा. खूपच लांब अंतर असेल तर दोन-चार स्टॉप आधी रिक्षा अथवा बस सोडावी आणि तेवढं तरी अंतर चालावं.

lp14हृदयविकाराचा विळखा घालणारे अनेक घटक आज समाजात कार्यरत आहेत. त्यापासून चार हात दूर राहायचं असेल, तर आचार-विचार, आहार-विहार सुधारणं हाच योग्य पर्याय आहे.
डॉ. गजानन रत्नपारखी

lp15सेवा क्षेत्रातील सततच बैठं काम यामुळे निद्रानाश, वारंवार छातीत दुखणं, पॅनिक होणं, ताणतणाव वाढणं अशा विकारांचा उद्भव वाढला आहे.
डॉ. पराग देशपांडे

lp16२०मिनिटांनंतर,२० सेकंदांसाठी २०फुटांच्या पुढील वस्तू पाहावी. सतत जवळचं पाहून डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचन पावतात, लांबचं पाहताना त्या विस्तारतात आणि त्यांना आराम मिळतो.
डॉ. राजेश पवार

lp17मधुमेहाची सुरुवात ही सर्वसाधारणपणे ४०-५०च्या आसपास होत असे, मात्र आता हेच प्रमाण २०-३० पर्यंत अलीकडे आले आहे. कृत्रिम जीवनशैली हाच यामागील महत्त्वाचा घटक आहे.
डॉ. शशांक जोशी

lp18आहार काय असावा
संपूर्ण शाकाहार, कोलेस्टेरॉल आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ टाळणं, सॅच्युरेटेड फॅट टाळणं, सामान्य तापमानाला घनरूपात असणाऱ्या (चीज, बटर वगैरे) गोष्टी खाणं टाळायला हवं. त्याच्या जोडीला करडई, सोयाबीन तेलाचा वापर करा. पाम ऑइल, वनस्पती तूप टाळा. गायीचं तूप तेदेखील सामान्य तापमानाला वापरावं. साखर, मीठ कमी वापरा. मैद्याचे पदार्थ- ब्रेड, बटर, खारी, बिस्कीट टाळा. पोळी-भाकरीसाठी कोंडय़ासहित पीठ वापरावं. भाज्या, फळं भरपूर खावीत, शक्यतो कच्चे पदार्थ खावेत. थोडक्यात काय, तर साधं राहणीमान ठेवावं, त्यामुळे समस्या कमी होतात, यावरच सर्व तज्ज्ञ भर देतात.

lp19राग हा खो-खोसारखा आहे. आपण मुलांना मारत नसलो तरी रागावण्यानं त्यांच्यात न्यूनगंड तयार होतो, रागावणं हे सर्वसाधारण बरोबरच असल्याचं त्याला वाटतं.
डॉ. हरीश शेट्टी

lp20शीतपेयं, अल्कोहल (शीतपेयामधून, बर्फ घालून), चिल्ड बीअर यांच्या सेवनामुळे दातांचं एनामिल पातळ होत जातं, दात कमकुवत होतात.
डॉ. विजय कदम

बदलत्या जीवनशैलीचा आणखीन एका मोठय़ा आजारात वेगाने वाढ होताना दिसते तो म्हणजे मधुमेह. डॉ. शशांक जोशी याबद्दल सांगतात की आपल्याकडच्या मधुमेहामध्ये आनुवंशिकतचे प्रमाण बरंच आहे, पण गेल्या दहा वर्षांतील वाढत्या प्रमाणाचं कारण हे आनुवंशिकपेक्षा जीवनशैलीतील बदल हेच आहे. ताणतणाव, खाण्यापिण्याच्या सवयी, फास्ट फूड, व्यायामाचा अभाव हेच त्यामागील कारण आहे. मधुमेहाची सुरुवात ही सर्वसाधारणपणे ४०-५०च्या आसपास होत असे, मात्र आता हेच प्रमाण २०-३० पर्यंत अलीकडे आले आहे. कृत्रिम जीवनशैली हाच यामागील महत्त्वाचा घटक आहे. वेळेवर खाणं, जेवण न टाळणं आणि ६-७ तासांची पुरेशी झोप घेणं हाच यावरील सर्वात महत्त्वाचा उपाय असल्याचं ते सांगतात.

नोकरी-व्यवसायातील कार्यपद्धती बदलल्या आणि आज संगणक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. एकेकाळी मान मोडून काम करणारे आता संगणकासमोर तासन्तास खर्ची घालू लागले आहेत. अर्थातच सातत्याने संगणकाकडे पाहण्यामुळे डोळ्यांच्या आजाराचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागले असल्याकडे नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश पवार नमूद करतात. ते सांगतात की, सातत्याने संगणकाकडे पाहण्यामुळे आपल्या डोळ्यांत कोरडेपणा तयार होतो. त्याला आम्ही कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं म्हणतो. हा कोरडेपणाच डोळ्यांना इतर विकारांकडे घेऊन जातो. डोळे चुरचुरणं, लाल होणं असे विकार दिसू लागतात. अर्थातच त्यासाठी केला जाणारा सततचा औषधोपचार आणि पर्यायाने त्या सततच्या औषधोपाचाराचे दुष्परिणाम असं हे चक्रच तयार होतं. पण संगणकाकडे पाहणं हे काही आपल्याला टाळता येत नाही, मग काय करायचं? डॉ. पवार त्यासाठी २०-२०-२० चं एक साधं सोप्पं सोल्युशन देतात. २० मिनिटांनंतर, २० सेकंदांसाठी २० फुटांच्या पुढील वस्तू पाहावी. सतत जवळचं पाहून डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचन पावतात, लांबचं पाहताना त्या विस्तारतात. बाहुल्यांचं विस्तारणं हे डोळ्यांच्या स्नायूंसाठी चांगलं असतं. साधारण दोन अडीच तासांनी अश्रू लेयरच्या बाष्पीभवनामुळे उष्णता वाढते अशा वेळी डोळ्यांना गार पाणी लावणं हा चांगला उपाय असतो. जेवणानंतर रोज रात्री दहा मिनिटे डोळे मिटून शांत बसा. प्रकाशाचं प्रमाण कमी झालं की बाहुल्यांचं विस्तारणं वाढतं आणि डोळ्यांना विश्रांती मिळते. अर्थात डोळ्यांच्या आरोग्यासाठी कायम डोळ्याचीच काळजी घ्यावी लागते असं नाही, तर आपण जे तेलकट, फास्ट फूड, जंक फूड खातो त्याने रक्तवाहिन्यांवरदेखील परिणाम होत असतो. आणि डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना त्याचा त्रास झाला तर डोळ्यांवरदेखील परिणाम होतात. म्हणजेच डोळ्याच्या आरोग्यासाठी आपल्या आहारावरदेखील नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
पण हा आहार ग्रहण करणारी जी रचना आहे त्यामध्ये आपले दात. दातांच्या आरोग्याबद्दल दंतचिकित्सक डॉ. विजय कदम सांगतात की आपल्या आहारातील बदलामुळे तेल, साखर, फॅट या सर्वाचं अतिरिक्त सेवन होत आहे. जोडीला व्यसन असेल तर आणखीनच स्फोटक परिस्थिती. एकेकाळी धूम्रपान आणि तंबाखू सेवनाने कॅन्सर होऊ शकतो, अशी धोक्याची सूचना असायची. आज त्याच ठिकाणी थेट कॅन्सर होतो, माणसाचा मृत्यू होऊ शकतो, असं लिहिलं जात आहे. त्यातच सारं काही आलं. दुसरा मुद्दा आहे तो शीतपेयं, अल्कोहल (शीतपेयामधून, बर्फ घालून), चिल्ड बीअर यांच्या सेवनाचा. या सर्वामुळे दातांचं एनामिल पातळ होत जातं, दात कमकुवत होतात. बऱ्याच वेळा आपले दात खूपच मजबूत आहेत, असं सांगणाऱ्यांच्या खाण्यातील बदल हळूहळू विकारांकडे नेत असतात. त्यामुळेच बाहेरचं किमान खाण्याचा प्रयत्न करा. घरी शांत बसून एकाग्रपणे घरचंच जेवण्याची सवय लावून घ्यावी लागेल. घरच्या अन्नात मूलभूत सात्त्विकता असते.

lp21बॅक टू बेसिक…
बदलत्या जीवनशैलीचे शारीरिक परिणाम जसे आहेत, तसेच मानसिक परिणामदेखील आहेत. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी सांगतात की सर्वात मोठा परिणाम होतोय तो म्हणजे भावनात्मक शेअरिंग कमी झालंय, आणि परिणामी नकारात्मक शेअरिंग वाढलंय. त्यामुळेच तर स्ट्रोक, अॅसिडिटी, हायपरटेन्शन, मधुमेह इ. ही यादी लांबणारी आहे. प्रेशर कुकरचा व्हॉल्व जाम झाल्यावर होतं तसं आपलं झालं आहे, मग हा कोंडलेला राग बाहेर काढता येत नाही. तो मुलं, बायको, वृद्ध आई-वडील यांच्यावर घरी निघतो. साधा टॉवेल इकडचा तिकडे झाला असला तरी त्यावरून वाद होतो. येथेच एक लक्षात ठेवावं लागेल, की राग हा खो-खोसारखा आहे. आपण मुलांना मारत नसलो तरी रागावण्यानं त्यांच्यात न्यूनगंड तयार होतो, रागावणं हे बरोबरच आहे असं त्याला वाटतं. जागतिकीकरणानंतर जग जवळ येत असलं तरी आपल्याला जवळच्या माणसाबद्दल खूप कमी माहीत असते. समाजाशी, कुटुंबाशी, नातेवाईकांशी आपला कनेक्ट तुटत चालला आहे. ‘मी’भोवती गुंफलेलं आयुष्य ‘आम्ही’भोवती कसं गुंफलं जाईल हे पाहणं अधिक गरजेचं आहे. मग काय करायचं? प्रत्येक काळाचे स्वत:चे प्रॉब्लेम असतात आणि त्या त्या काळात त्याची उत्तरंदेखील दडलेली असतात. सर्वात क्लासिकल गाइड म्हणजे बॅक टू बेसिक. आपण कोठे थांबायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. एक लाख पगाराऐवजी ७५ हजार पगार मिळणार असेल आणि घरी दोन तास जास्त मिळणार असतील तर काय स्वीकारायचं हे स्वत:लाच ठरवावं लागेल.

महत्त्वाचं म्हणजे जीवनशैलीतला बदल हा केवळ कोणत्याही एका वर्गापुरता मर्यादित राहिलेला नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनशैलीतील या बदलांनी आणि त्यामुळे होणाऱ्या विकारांनी िलगभेद, वर्गभेदाच्या भिंतीदेखील पाडून टाकल्या आहेत. पुरुषांच्या बरोबरीनेच महिला देखील सर्वच क्षेत्रांत मोठय़ा प्रमाणात कार्यरत आहेत. अर्थातच कामाबरोबरच आहार-विहाराचे तोटे त्यांनादेखील सोसावे लागत आहेत. तर दुसरीकडे जंक फूड म्हणताना केवळ पिझ्झा-बर्गरलाच टारगेट केलं जातं, पण वडा-पाव, समोसा असे अस्सल भारतीय पदार्थदेखील शरीरात साखर, फॅट, तेल वाढवत असतात. जीवनाच्या शर्यतीत टिकून राहणं हा आजचा अविभाज्य घटकच बनला आहे. जगण्याची शर्यत झाली आहे. मग या धकाधकीत आम्ही चार घटका मौजमजा करायचीच नाही का? यावर सर्वच तज्ज्ञांचं एकमत आहे ते म्हणजे हे खाणं शक्यतो टाळाच. एखाद्या दिवशी महिन्यातून काही खाल्लं तर ठीक, पण ते खातानादेखील नियंत्रण असावं लागेल. अशी आचार-विचार-आहार शैली अंगी बाणवणं अवघड असलं तरी कठीण नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

थोडक्यात काय तर वेगवान स्पर्धेत धावणाऱ्या आजच्या पिढीला स्वत:च्या निरोगी भविष्यासाठी थोडा तरी ब्रेक लावावाच लागेल. पण त्याही पलीकडे जाऊन आणखी एका महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे लक्ष वेधण्याची गरज आहे, ते म्हणजे आज आपण जी जीवनशैली जगत आहोत त्याचा परिणाम आणि अनुकरण भावी पिढीकडून होत आहे. म्हणजेच अजून २०-२५ वर्षांनी येणाऱ्या तरुणाईला या आजारांचा सामना आणखी मोठय़ा प्रमाणात करावा लागू शकतो. खाण्या-पिण्याच्या सवयी, पुरेशी झोप, व्यायाम या सर्वाच्या अभावापायी येणाऱ्या पिढीवर त्याचे परिणाम हमखास होतील, याबद्दल सारेच तज्ज्ञ सहमत आहेत. किंबहुना कमी वयात येणारा हृदयविकार, लहानपणी लठ्ठपणा असणाऱ्या मुलांना चाळिशीनंतर हमखास होणारा मधुमेह, डोळ्यांचे विकार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक आरोग्य बिघडणे हे सारे दृश्य परिणाम आताच जाणवत आहेत. मुलांसाठी कमी वेळ देता येणं या मानसिकतेपोटी अनेक वेळा अनावश्यक सुविधांचा भडिमार पालक मुलांवर करताना दिसत आहेत. हेच ते स्वत:बाबतदेखील करीत आहेत.
वेगवान, स्पर्धा असणारी बदललेली जीवनशैली आणि त्या अनुषंगिक येणारे आजार हे आपणच आपल्याभोवती निर्माण केलेले चक्र आहे. आपण त्यात खुशीने शिरलो आहोत. कोठे थांबायचे, उद्याचे काय हे ओळखावे लागेल. किंबहुना त्यांच्यासाठी आपल्या आचार, विचार, आहार-विहारावर नियंत्रण राखणे आणि आपल्या मुळांकडे परत जाणे अर्थात बॅक टू बेसिक हाच फंडा वापरणे गरजेचे आहे.