राज्यात आज (गुरूवार) एकूण १९ लोकसभा मतदार संघांमध्ये अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. या पार्श्वभूमीवर लोकसत्ता संकेतस्थळावर या तिसऱया टप्प्यातील मतदार संघांमधील मतदानाचे लाईव्ह अपडेट्स वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. वाचकांनीही या लाईव्ह अपडेट्स ब्लॉग भरघोस प्रतिसाद दिला… दिवसभरात करण्यात आलेले लाईव्ह अपडेट्स पुढीलप्रमाणे-

18:56 by लोकसत्ता

 

लोकसत्ता लाइव्ह ब्लॉगला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनापासून आभार.

18:36 by लोकसत्ता महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात सरासरी ५५.९४ टक्के मतदान. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे. * नंदुरबार – ६२% * धुळे- ६१% * जळगाव – ५६% * रावेर – ५८% * जालना – ६३% * औरंगाबाद – ५९% * दिंडोरी – ६४% * नाशिक – ६०% * भिवंडी – ४३% * पालघर – ६८% * कल्याण – ४२% * ठाणे – ५२% * उत्तर मुंबई – ५२% * उत्तर-पूर्व मुंबई – ५३% * उत्तर मध्य मुंबई – ५५ * उत्तर-पश्चिम मुंबई – ५०% * दक्षिण मुंबई – ५४% * दक्षिण-मध्य मुंबई – ५५% * रायगड – ६४% —————————————- 18:18 by लोकसत्ता

v id=”div-191190027″ data-uptime=”2014-04-24 08:48:39″ data-id=”191190027″> बॉलीवूड अभिनेता ह्रतिक रोशनची घटस्फोटीत पत्नी सुझान खान हिनेही आपला मतदानाचा हक्क बजावला. (छाया – अमित चक्रवर्ती )

18:14 by लोकसत्ता बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनीही सपत्निक मतदानाचा हक्क बजावला. (छाया – अमित चक्रवर्ती )

18:12 by लोकसत्ता राज्यभर मतदानाची वेळ संपली. आता लक्ष १६ मे च्या निकालाकडे.

18:06 by लोकसत्ता मुंबईतील लोकसभा मतदारसंघांमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत झालेले मतदान पुढीलप्रमाणे; * उत्तर मध्य मुंबई – ४७% * उत्तर-पूर्व मुंबई – ४७.५०% * उत्तर-पश्चिम मुंबई – ४६% * उत्तर मुंबई – ४८% 17:59 by लोकसत्ता

संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची टक्केवारी. * मीरा-भाईंदर – ४३% * माजीवडे – ४४% * पाचपाखाडी – ४५% * ठाणे – ४५% * ऐरोली – ४१.४३% * बेलापूर – ४०.७५% 17:55 by लोकसत्ता

मुंबई – धारावीत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५१ टक्के मतदान.

17:51 by लोकसत्ता उद्योगपती मुकेश अंबानी यांनीसुध्दा सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

17:46 by लोकसत्ता कॉंग्रेस उमेदवार गुरूदास कामत यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांना पोझ देताना.

17:44 आधी लगीन मतदानाचं..म्हणत वरळीतील अनिल शिंदे यांनी आपल्या लग्नाला जाण्याआधी मतदानाचे कर्तव्य पार पाडले (छाया- प्रदिप कोचरेकर)

17:43 by लोकसत्ता शहरात अनेक ठिकाणी मतदानाचा उत्साह दिसत असला तरी, गेल्या निवडणुकीचा विक्रम मुंबई आणि ठाण्याचे मतदार मोडीत काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

17:37 by लोकसत्ता संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी * ठाणे – ४२.३६% * कल्याण – ३५.६८% * भिवंडी – ३७.६५% * पालघर – ४८.२३% * औरंगाबाद – ४५.१६% * जालना – ५३.३३% *धुळे ५०.८६% * नंदुरबार – ५४.५०%

17:25 by लोकसत्ता ठाण्यात भर उन्हातही महिलांनी लांबच लांब रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. (छाया – दीपक जोशी )

17:22 by लोकसत्ता बॉलीवूडमधील सर्वात प्रमुख परिवार ‘बच्चन’ कुटुंबियांनीही एकत्रितपणे मतदानाचा हक्क बजावला. (छाया – अमित चक्रवर्ती )

17:16 by लोकसत्ता मतदान करण्यासाठी उरली अवघी ४५ मिनिटं

17:14 by लोकसत्ता मतदान केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. (छाया – दीपक जोशी )

17:10 by लोकसत्ता ठाण्यात वयोवृध्द मुस्लिम महिलेने मतदानाचा हक्क बजावला. (छाया – दीपक जोशी )

17:06 by लोकसत्ता मुंबई – ठाण्यात अनेकांनी सहकुटुंब मतदानाला हजेरी लावल्याचं चित्र दिसत होतं. (छाया – दीपक जोशी )

17:03 by लोकसत्ता दक्षिण मुंबईत दुपारी ३ वाजेपर्यंत ३९.७० टक्के मतदानाची नोंद.

17:02 by लोकसत्ता ठाण्यात तृतीयपंथीयांनीसुध्दा रांग लावून मतदान केले.

17:01 by लोकसत्ता मतदार यादीत नावं नसल्याने इशान्य मुंबईतील साधारण १०० ते २०० नागरिकांनी मुलुंड येथील निवडणूक कार्यालयात जाऊन अधिका-यांना घेराव घातला.

16:51 फोटो गॅलरी: सेलिब्रिटींचे मतदान..http://loksa.in/bxC80938

16:49 by लोकसत्ता ठाण्यातील झोपडपट्टी भागात मतदानाचा टक्का अधिक.

16:49 by लोकसत्ता मुंब्रा, राबोडी, हजुरी, नया नगर येथे भरघोस मतदान.

16:37 by लोकसत्ता जळगावमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान

16:37 by लोकसत्ता धुळ्यात दुपारी तीन वाजेपर्यंत ४९.१० टक्के मतदान

16:23 by लोकसत्ता मुंबई – कांदिवली येथील ठाकूर व्हिलेजमध्ये भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. परिणामी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

16:12 by लोकसत्ता दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी * रावेर – ३८.५२% * दिंडोरी – ४५.२५% * नाशिक – ३९.२४% * ठाणे – २६.२५% * दक्षिण-मध्य मुंबई – ३२.०६% * दक्षिण मुंबई – २९%

16:08 by लोकसत्ता दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी * धुळे – ३७.३८ % * जळगाव – ३६.७७% * जालना – ४१.८६% * उत्तर-पश्चिम मुंबई – ३७.३५ % * रायगड – ४३%

16:07 by लोकसत्ता मराठी अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने नाशिकमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. (छाया – समीर देशपांडे, नाशिक)

15:56 by लोकसत्ता अभिनेता आमिर खान यानेसुध्दा सपत्निक मतदानाचा हक्क बजावला.

15:53 by लोकसत्ता तृतीयपंथीय लक्ष्मी त्रिपाठीनेही बजावला मतदानाचा हक्क.

15:50 by लोकसत्ता दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी * नंदुरबार – ४१.१०% * जालना – ४१.८६% * औरंगाबाद – ३४.८८% * पालघर – ३०.२५% * भिवंडी – २५.२८% * कल्याण – २७.३५% * ठाणे – २६.२५% * उत्तर मुंबई – ४०.०७% * उत्तर-पूर्व मुंबई – ३५% * उत्तर-मध्य मुंबई – ३६%

15:44 by लोकसत्ता तृतीपंथी लक्ष्मी त्रिपाठीनेही बजावला मतदानाचा हक्क.

15:42 by लोकसत्ता सिध्दार्थ नगरमध्ये दलित मतदारांची मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर गर्दी. अनेक ठिकाणी पोलीस घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या मतदारांच्या तक्रारी.

15:39 by लोकसत्ता मुंबई – दुपारी दोन वाजेपर्यंत विलेपार्ले भागात ४५ टक्के मतदान.

15:32 by लोकसत्ता बॉलीवूड अभिनेत्री पेरीझाद झोराबियन हिनेसुध्दा वांद्रे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला. (छाया -प्रदीप दास )

15:31 मतदार संघाबाहेर जाण्यास खासदार, आमदारांना मज्जाव: loksa.in/fiu80927

15:29 by लोकसत्ता मतदानासाठी ओळखपत्र म्हणून आणि खात्री करून घेण्यासाठी मतदारांकडे पासपोर्टची मागणी. यासंदर्भात कॉंग्रेस उमेदवार गुरूदास कामत यांची निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार.

15:17 by लोकसत्ता मालाड – मालवणी येथील पालिका शाळेत मतदारांची नावे सापडत नसल्याने नागरिकांच्या वतीने निवडणूक कर्मचा-यांशी संवाद साधताना कॉंग्रेस उमेदवार संजय निरूपम.

15:12 by लोकसत्ता मुंबईत आज मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी आणि खासगी व्यवहार ठप्प आहेत. परंतू बोरीवली येथील देवीपाडा नाक्यावर उभ्या असलेल्या या नाका कामगारांना मात्र आजच्या रोजीरोटीची चिंता सतावत आहे.

15:07 by लोकसत्ता शिवडी येथे मुस्लिम मतदारांचे मोठ्या प्रमाणात मतदान.

15:03 by लोकसत्ता मुंबईतील गुजराती समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती असलेल्या कांदिवली येथील महावीर नगर, बोरीवली येथील एस. वी. रोड येथे उन्हाची तमा न बाळगता मतदारांची मतदानाच पसंती. या परिसरात दुपारी २ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान.

15:03 by लोकसत्ता उत्तर मुंबईमध्ये दुपारी एकपर्यंत २८ टक्के मतदान

15:03 by लोकसत्ता वायव्य मुंबईमध्ये दुपारी एकपर्यंत २६ टक्के मतदान

15:02 by लोकसत्ता ईशान्य मुंबईमध्ये दुपारी एकपर्यंत २७ टक्के मतदान

15:00 by लोकसत्ता चांदिवली विधानसभा अंतर्गत येणा-या विमानतळानजीकच्या नजीकच्या संदेश नगर – बैलबाजार परिसरातील अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब. चिडलेले मतदार रस्त्यावर उतरले.

14:49 by लोकसत्ता धुळ्यात दुपारी एकपर्यंत ३१.८५ टक्के मतदान

14:49 by लोकसत्ता दिंडोरीमध्ये एकपर्यंत ३४.८५ टक्के मतदान

14:49 by लोकसत्ता दक्षिण-मध्य मुंबईमध्ये एकपर्यंत २७ टक्के मतदान

14:49 by लोकसत्ता दक्षिण मुंबईमध्ये एक वाजेपर्यंत २२.३० टक्के मतदान

14:49 by लोकसत्ता जळगावमध्ये मतदारांचा अल्प प्रतिसाद, दुपारी एकपर्यंत १४.८३ टक्के मतदान

14:48 by लोकसत्ता नाशिकमध्ये एक वाजेपर्यंत २७.५५ टक्के मतदान

14:34 by लोकसत्ता ठाण्यात मतदान केंद्र अधिकारी वैषाली भाले यांचा मतदान केंद्रातच मृत्यु.

14:33 by लोकसत्ता महायुतीचे मतदान : आशिष शेलार, आदित्य ठाकरे, उध्दव ठाकरे, पूनम महाजन, रामदास आठवले.

14:21 by लोकसत्ता पहिल्यांदा मतदान करणारी युवा मतदार पूजा! Do your best Leave the rest No fancy qoute BUT Extremely important to Vote!

14:17 by लोकसत्ता भाजप उमेदवार पूनम महाजन आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

14:14 by लोकसत्ता दिवा आणि कल्याण ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांमध्ये बिघाड. अर्ध्या तासापासून मतदान बंद.

14:13 by लोकसत्ता रायगडमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत ३३.८७ टक्के मतदान

14:12 by लोकसत्ता भाजप नेते विनोद तावडे यांनीदेखिल आपला मतदानाचा हक्क बजावला.

14:10 by लोकसत्ता नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

14:09 by लोकसत्ता बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा हमशकल मोहसीन खान यानेसुध्दा गोवंडी येथे मतदानाचा हक्क बजावला.

13:48 by लोकसत्ता तरूणाईनेही केले मतदान. Go out and vote!

13:47 by लोकसत्ता नाशिकमधील राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत मतदान केले.

13:47 by लोकसत्ता रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी सहकुटुंब मतदान केले.

13:44 by लोकसत्ता भाजप नेते आशिष शेलार यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

13:41 by लोकसत्ता डोंबिवलीतील संघाच्या कार्यकर्त्यांचे संघाच्या गणवेशात मतदान. कल्याण जिल्हा संघचालक मधुकरराव चक्रदेव यांनीही संघाच्या गणवेशातच मतदानाला हजेरी लावली होती.

13:38 by लोकसत्ता तरूण मतदार. Feeling excited!

13:34 by लोकसत्ता चेंबूर झोपडपट्टीमधून मतदानासाठी येणा-या मतदारांना पीएसआय लक्ष्मण भालेराव यांची दमदाटी, तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी हुज्जत. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी निवडणक आयोगाचे ओळखपत्र दाखविले तरी मतदान केंद्राच्या आवारात जाण्यास मज्जाव. मतदारांमध्ये प्रचंड चीड. याच भागात मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

13:25 by लोकसत्ता व्हिवा लाऊंजची पुढील आठवड्यातील पाहुणी मॉडेल अमृता पत्कीचेही मतदान.

13:21 by लोकसत्ता अभिनेता आणि भाजपचे गुजरातमधील उमेदवार परेश रावल यांनीदेखिल मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. (छाया – अमित चक्रवर्ती )

13:18 by लोकसत्ता मालाड येथील संस्कार महाविद्यालयात मतदारांचे उत्स्फुर्त मतदान.

13:06 by लोकसत्ता माहिममध्ये व्होटींग स्लीपच्या घोळामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित..मतदार यादीत मृत व्यक्तिंची नावे आहेत मात्र जिवंत व्यक्तिंची नावे गायब.

12:52 by लोकसत्ता भांडूप आणि मुलूंडमध्ये मतदानासाठी मतदारांच्या रांगा.

12:45 by लोकसत्ता बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल यानेही जुहू येथे मतदान केले. (छाया- अमित चक्रवर्ती )

12:42 by लोकसत्ता बोरीवलीतील आयसी कॉलनीतील मतदान केंद्रांवर ख्रिश्चन मतदार मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.

12:41 by लोकसत्ता मतदान केंद्राबाहेर मतदारांची नावे ऑनलाइन शोधण्यासाठी कॉम्प्युटर्स लावण्यात आले आहेत.

12:35 by लोकसत्ता भांडूप, कांजूर, घाटकोपरमध्ये मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा. भाजप उमेदवार किरीट सोमय्या यांनी मतदारांना दिलेल्या मतदान स्लीप घेऊन आत जाण्यावरून गुजराती मतदारांची पोलिसांशी हुज्जत.

12:33 by लोकसत्ता रायगडमधील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

12:29 by लोकसत्ता मुंबईसह ठाण्यातील मतदारसंघांमध्ये हजारो मतदारांची नावे मतदारयादीतून गायब

12:27 by लोकसत्ता गोवंडी – शिवाजी नगर येथील शिवाजी हायस्कूलमध्ये मतदानासाठी लागलेली मतदारांची रांग.

12:24 by लोकसत्ता मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनेही जुहू येथे मतदानाचा हक्क बजावला. (छाया अमित चक्रवर्ती )

12:23 by लोकसत्ता कल्याणमध्ये ११ वाजेपर्यंत ११.५ टक्के मतदान

12:23 by लोकसत्ता मुंबई – जमनाबाई नरसी स्कूल, जुहू येथील मतदान केंद्रावर बॉलीवूड अभिनेता धमेंद्रने मतदानाचा हक्क बजावला. (छाया – अमित चक्रवर्ती )

12:17 उद्योगपती अनिल अंबानी यांनीही मतदानाचा हक्क बजावला

12:17 by लोकसत्ता दक्षिण मुंबईत मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा.

12:14 by लोकसत्ता नाशिकमध्ये ११ पर्यंत १७ टक्के मतदान

12:14 by लोकसत्ता रावेरमध्ये सकाळी ११ पर्यंत १३ टक्के मतदान

12:13 by लोकसत्ता रायगडमध्ये पहिल्या चार तासांत २२ टक्के मतदान

12:13 by लोकसत्ता पालघरमध्ये ११ वाजेपर्यंत १२.५ टक्के मतदान

12:12 by लोकसत्ता जळगावात अकरा वाजेपर्यंत १३ टक्के मतदान

12:10 by लोकसत्ता धुळ्यात ११ पर्यंत १८.७० टक्के मतदान

12:09 by लोकसत्ता दिंडोरीमध्ये अकरापर्यंत १८ टक्के मतदान

12:08 by लोकसत्ता नंदूरबारमध्ये पहिल्या चार तासांत २०.६ टक्के मतदान

12:07 by लोकसत्ता औरंगाबादेत सकाळी ११ वाजेपर्यंत १८ टक्के मतदान

12:04 by लोकसत्ता मुंबईतील सहा मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी १७ टक्के मतदान

12:00 by लोकसत्ता डोंबिवलीत ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा पोलिसांना ताप. कार्यकर्त्यांना मतदान केंद्राजवळून हुसकावले.

11:57 by लोकसत्ता मतदानासाठी सर्व वयोगटातील महिलांची उपस्थिती लक्षणीय.

11:52 by लोकसत्ता म्हैसूर कॉलनी (चेंबूर ) येथे मतदानाला तुफान गर्दी.

11:44 by लोकसत्ता कुर्ला येथील मतदान केंद्राबाहेरील मतदारांची रांग.

11:37 ‘बर्थ डे बॉय’ सचिन तेंडुलकरनेही मतदान केल्यानंतरचे छायाचित्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आणि वाढदिवशी मतदान करून चांगली सुरूवात झाल्याचेही त्याने नमूद केले. तसेच प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून जबाबदारीने मतदान करावे असे आवर्जुन सांगितले

11:33 by लोकसत्ता चुनाभट्टी येथील विद्याविकास हायस्कूल येथे मनसे उमेदवार महेश मांजरेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

11:27 by लोकसत्ता फुरकानिया मस्जिद चौक, बैगनवाडी येथे लोकांशी संवाद साधताना आप पक्षाच्या उमेदवार मेधा पाटकर.

11:24 by लोकसत्ता मालाड – मालवणी येथे मतदार यादीत नावं नसल्याच्या मतदारांच्या तक्रारी ऐकताना कॉंग्रेस उमेदवार संजय निरूपम.

11:18 by लोकसत्ता मतदानापूर्वी मनसे उमेदवार महेश मांजरेकर यांनी पत्नीसह सिध्दिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

11:16 by लोकसत्ता पालघर लोकसभा मतदार संघातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी मतदानाचा हक्क बजावला.

11:11 by लोकसत्ता “Line and shine.. get inked” लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनीदेखिल मतदानाचा हक्क बजावला.

11:02 by लोकसत्ता मतदार यादीत नाव नसल्याने अनेक ठिकाणी मतदारांचा भ्रमनिरास. यादीत नाव नसलेल्यांचं नाव विविध याद्यांमध्ये तपासण्यासाठी वेगळ्या रांगा लागल्याचे चित्र अनेक मतदान केंद्रांवर पहायला मिळत आहे.

10:48 by लोकसत्ता नंदूरबारमध्ये कॉंग्रेसचे माणिकराव गावित आणि भाजपच्या हिना गावित यांच्याकडून मतदान

10:48 by लोकसत्ता ठाण्यातील ज्ञानसाधना शाळेत मतदारांच्या रांगा. मतदार दोन तास रांगेत उभे. केंद्रावर दोन कर्मचारी अधिक वाढण्यात आले.

10:45 by लोकसत्ता मतदानाची पहिल्या दोन तासांतील टक्केवारी रायगड – ९ दक्षिण मुंबई – ७.४० दक्षिण-मध्य मुंबई – ७ उत्तर-मध्य मुंबई – ५ ईशान्य मुंबई – ७ वायव्य मुंबई – ७.९९ उत्तर मुंबई – ९ ठाणे – ६.१२ कल्याण – ६.८९ भिवंडी – ७ पालघर – ६ नाशिक – ८.३० दिंडोरी – ८ औरंगाबाद – १०.२० जालना – १०.४९ रावेर – ७.९० जळगाव – ८.१० धुळे – ७.९८ नंदूरबार – ९.५३

10:45 ईशान्य मुंबई मतदारसंघातील ‘आप’च्या उमेदवार मेधा पाटकर यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी इतर पक्षांकडून मतदारांना पैसे वाटले गेल्याचा आरोप केला आहे. 10:41 by लोकसत्ता

राज्यातील १९ मतदारसंघांमध्ये पहिल्या दोन तासांत सरासरी ७.८३ टक्के मतदान

10:39 by लोकसत्ता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगी उर्वशी यांच्यासोबत दादर येथील बालमोहन शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

10:35 by लोकसत्ता मतदानाच्या आधी मनसे उमेदवार महेश मांजरेकर यांनी माहिम दर्ग्याला भेट दिली.

10:31 by लोकसत्ता मुंबई, ठाणे आणि रायगडमधील पहिल्या दोन तासांतील मतदानाची टक्केवारी.

10:26 by लोकसत्ता रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानासाठी निघालेल्या आजीबाई

10:23 by लोकसत्ता मनसे अध्यक्ष राज ठाकरे बालमोहन शाळेत दाखल.

10:19 by लोकसत्ता मुंबई – ठाण्यात मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा. मात्र, रांगेत तरूण मतदारांची उपस्थिती नगण्य.

10:18 by लोकसत्ता मतदानासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बालमोहन शाळेत दाखल.

10:09 by लोकसत्ता मनसे उमेदवार महेश मांजरेकर कुटुंबियांसह मतदानासाठी रवाना.

10:07 by लोकसत्ता मुंबई – दादर येथील बालमोहन शाळेत अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण याने मतदानाचा हक्क बजावला.

10:05 by लोकसत्ता शिवसेना प्रकरणात मारहाण झालेल्या पोलीसाची कॉंग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी जॉय रूग्णालयात जाऊन भेट घेतली. पोलीसाची प्रकृती स्थिर पण चिंताजनक.

09:56 by लोकसत्ता ठाण्यात सकाळी नऊपर्यंत सरासरी ९ टक्के मतदान.

09:49 by लोकसत्ता मतदान केंद्रांबाहेर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांची नावे शोधण्यासाठी लँपटॉप चा वापर.

09:44 by लोकसत्ता रायगडमध्ये पहिल्या दोन तासांत ९.६ टक्के मतदान… सर्वत्र शांततेत मतदान सुरू

09:42 by लोकसत्ता जालन्यात नऊपर्यंत साडे दहा टक्के मतदान

09:41 by लोकसत्ता नंदूरबारमध्ये नऊ वाजेपर्यंत ९ टक्के मतदान

09:41 by लोकसत्ता “मतदान करणे हे देशभक्तीचे काम आहे. आणि मी खूप नशिबवान आहे, मला मतदानाचा हक्क बजावता आला.” – मेधा पाटकर (आप उमेदवार)

09:37 by लोकसत्ता अभिनेत्री रेखा, अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी मुंबईतील वांद्रे येथे मतदानाचा हक्क बजावला.

09:37 by लोकसत्ता सकाळी नऊपर्यंत औरंगाबादेत ८.२ टक्के मतदान

09:36 by लोकसत्ता सकाळी नऊपर्यंत धुळ्यात ८.५ टक्के मतदान

09:33 by लोकसत्ता आम आदमी पक्षाच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी बजावला मतदानाचा हक्क.

09:30 by लोकसत्ता मुंबई – ठाण्यात पहिल्या दोन तासांत मतदानाला चांगला प्रतिसाद. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा.

09:28 by लोकसत्ता हितेंद्र ठाकूर यांचे सहकुटुंब मतदान.

09:22 by लोकसत्ता भाजप उमेदवार किरीट सोमय्या यांनी मतदानाचा हक्क बजावला. “इतिहास लिखा जा रहा है, परिवर्तन हो रहा है” – किरीट सोमय्या

09:19 by लोकसत्ता दक्षिण मुंबई – सकाळपासूनच गिरगाव, चिराबाजार आणि वाळकेश्वरमध्ये मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा.

09:12 by लोकसत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला

09:06 by लोकसत्ता अभिनेत्री वंदना गुप्ते यांनाही मतदानाचा हक्क बजावता आला नाही. “गेली 40 वर्षे मी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील मतदान केंद्रावर मतदान करत आहे. पण यावेळी माझे नाव मतदार यादीत नाही असे मला सांगण्यात आले. इतकं हेल्पलेस कधीच वाटले नव्हते. मला बंगळुरू ला जायचे होते, तो कार्यक्रम मी पुढे ढकलला. परंतू मतदान करता न आल्यामुळे खूप वाईट वाटत आहे.” – वंदना गुप्ते

08:58 by लोकसत्ता अभिनेता अतुल कुलकर्णी मतदानापासून वंचित. “गेली 12 वर्षे मी याच पत्त्यावर (गोरेगाव-मुंबई ) राहतोय आणि यापूर्वी येथूनच 4 वेळा मतदानाचा हक्कही बजावला आहे. मात्र, यावेळी मतदार यादीतून माझे नावच गायब आहे. – अतुल कुलकर्णी

08:43 by लोकसत्ता दक्षिण-मध्य मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांची पत्नी कामिनी यांच्याकडून पोलीस हवालदाराला मारहाण. त्यांच्याविरुद्ध ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पैसे वाटताना पोलीस हवालदाराने विरोध केल्यामुळे त्याला मारहाण…

08:38 by लोकसत्ता मुंबई – माहिम येथील व्हिक्टोरीया स्कूलमध्ये मनसे उमेदवार आदित्य शिरोडकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

08:35 by लोकसत्ता ठाणे येथील सेंट जॉन शाळेत राजन विचारे यांचे सहकुटुंब मतदान.