लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुसऱया टप्प्यातील मतदानाचे लाईव्ह अपडे्टस वाचकांना मिळावेत यासाठी लोकसत्ताने ‘लाईव्ह अपडेट्स ब्लॉग दिनांक १७ एप्रिल २०१४ रोजी केला होता.
यात राज्यातील १९ मतदारसंघांच्या रणधुमाळीत सुरू असलेल्या ताज्या घडामोडी लोकसत्ता संकेतस्थळाने वाचकांपर्यंत पोहोचविल्या. कुठे मतदार यादीतून मतदारांची नावेच गायब होण्याच प्रकार, तर कुठे मतदान यंत्रांतील बिघाडामुळे प्रत्येक मत ‘पंजा’लाच पडत असल्याचा प्रकार आणि दिवसभरातील मतदानाची टक्केवारी अशाप्रकाराच्या सर्व घटनांची माहिती लोकसत्ताच्या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचकांना उपलब्ध करून देता आली. तसेच मतदान जागृतीच्या उद्देशाने मतदान केल्यानंतरचे छायाचित्र आमच्यापर्यंत पोहोचविण्याच्या आवाहनालाही वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिला. या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही त्या मतदारांची छायाचित्रेही या ब्लॉगवरून शेअर केली.
वाचकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
लाईव्ह ब्लॉगमधील अपडेट्स- लोकसभा निवडणूक २०१४ #LiveUpdates