लाचखोरीचा ठपका लागलेल्या महापौर तृप्ती माळवी यांना सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय तूर्त बारगळला आहे. याबाबत रीतसर कायदेशीर प्रक्रिया कशी करायची याचा अभ्यास करून त्यांना पक्षातून काढून टाकले जाणार असून तशा हालचाली सायंकाळी सुरू झाल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेते राजू लाटकर यांनी पक्षाच्या सर्व २७ नगरसेवकांची बठक बुधवारी आयोजित केली असल्याची नोटीस पाठविली आहे. या बैठकीस महापौरांना निमंत्रित करायचे की नाही या तांत्रिक मुद्दावर पक्ष अडकला आहे.
लाचखोरीच्या एका प्रकरणामध्ये महापौर तृप्ती माळवी रंगेहात पकडल्या गेल्या. त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा मुद्दा पुढे आला. अशातच मुदत संपूनही माळवी यांनी महापौर पदाचा राजीनामा न दिल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची खप्पामर्जी झाली. या साऱ्याचा परिणाम म्हणून माळवी यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय सोमवारी घेण्याची ठरले होते. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी पक्षाच्या काही नगरसेवकांची चर्चाही केली होती.
सोमवारी सायंकाळी याबाबतचा निर्णय अपेक्षित असतानाच पक्षात वेगळीच सूत्रे फिरली. माळवी यांची थेट हकालपट्टी करण्याची प्रक्रिया चुकीची ठरेल हे लक्षात आल्यानंतर रीतसर प्रक्रिया करण्याची पक्षाने ठरविले आहे. त्यासाठी गटनेते राजू लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवकांची बठक होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन लाटकर यांनी सर्व २७ नगरसेवकांना बुधवारी बठक होणार असल्याची नोटीस पाठविली आहे, अशी माहिती शहराध्यक्ष आर.के.पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी धर्मसंकटात
कोल्हापूर महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर माळवी यांच्या उपस्थितीतील सर्व कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी नगरसेवकांची बठक होणार असून या बठकीस महापौरांना निमंत्रित करण्यावरून पक्ष धर्मसंकटात सापडला आहे. माळवी यांना बठकीस न बोलवल्यास त्यांचा बठकीत उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचा नसíगक हक्क डावलला जाण्याची शक्यता आहे. तर बठकीस बोलावल्यास त्यांच्या उपस्थितीत बठक होणार असल्याने बहिष्काराचा निर्णय बासनात गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे याबाबतही कायदेशीर मुद्दे तपासले जाणार आहेत.