इचलकरंजी येथील दाते मळ्यातील के.व्ही. पालनकर या सराफी दुकानावर सशस्त्र दरोडा प्रकरणी २४ तासांनंतरही पोलिसांना कसलेही धागेदोरे सापडले नसल्याचे रविवारी सायंकाळी दिसून आले. सुमारे ४ कोटी रुपयांचे दागिने व रोख रक्कम लुटली गेलेल्या या गुन्ह्याच्या  तपासासाठी स्वतंत्र ६ पथकं कार्यरत केली असून लवकरच चोरटय़ांना पकडण्यास पोलिसांना यश येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. तपास कार्याचा आढावा घेण्यासाठी रविवारी पोलीस अधिकाऱ्यांची बठक घेतली असून घटना गंभीर असल्याने गुन्ह्याचा तपास स्वतकडे असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक चतन्या एस. यांनी दिली. दरोडेखोरांनी दुकानातील माहितगार व्यक्तीला हाताशी धरून डल्ला मारल्याची चर्चा सुरू आहे.
दाते मळ्यात कमलाकर पालनकर यांच्या के.व्ही. पालनकर ज्वेलर्स दुकानात २८ मार्च रोजी पहाटे चोरटय़ांनी दुकानाच्या वॉचमनला बांधून सशस्त्र दरोडा टाकला होता. या दरोडय़ात चोरटय़ांनी सोन्याच्या अंगठय़ा, नेकलेस, िरगा, सोन्याचे बिस्कीट यासह ११ किलो सोने, सुमारे ३०० किलो चांदी असा सुमारे ४ कोटीचा ऐवज लंपास केला. शहरात इतक्या मोठय़ा प्रमाणात दरोडा पडला असल्याची माहिती मिळूनही पोलीस ठाणे हद्दीचा वाद उपस्थित करून पोलीस घटनास्थळी फिरकलेच नाहीत. मात्र वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर झाल्याचे समजताच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती. घटनेचं गांभीर्य ओळखून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. सी.सी टी.व्ही. कॅमेऱ्याच्या फुटेजवर माहिती घेतली असता सहाहून अधिक चोरटय़ांचा यामध्ये सहभाग असून दुकानातील माहितगार व्यक्तीस हाताशी धरून डल्ला मारल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.
रविवारी या धाडसी दरोडय़ाच्या घटनेला २४ तास उलटूनही अद्याप पोलिसांच्या हाती काही धागेदारे सापडलेले नाहीत. दरोडय़ाच्या तपासाबाबत पोलीस उपअधीक्षक चतन्या एस. यांच्याशी संपर्क साधला असता तपासासाठी पोलिसांनी ६ स्वतंत्र पथके तयार करून ती महाराष्ट्र, कर्नाटकातील वेगवेगळ्या भागात रवाना केली आहेत. गंभीर घटना असल्याने या घटनेचा तपास स्वतकडे असून दोन वर्षांपूवी शहरातील पंचवटी टॉकीजच्यामागे िरगरोडवर असलेल्या कृष्ण-कुंज बंगल्यावरही दरोडा पडला होता. त्या आणि पालनकर ज्वेलर्स दुकानावर पडलेल्या दरोडय़ात साम्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.