उत्कट प्रेम आणि राष्ट्र प्रेम यांचे परस्पर नाते उलगडनारी भव्य कलाकृती म्हणजे “निळकंठ मास्तर”…. अजय अतुल यांच्या उपस्थितीमध्ये निळकंठ मास्तर या चित्रपटाचे  फर्स्ट लूक लाँच करण्यात आले. या चित्रपटाची पहिली झलक पाहण्यासाठी पुणेकरांनी तुफान गर्दी केली होती. या लूक लाँच सोहळ्याला अजय अतुल यांच्या बरोबरचं दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, अभिनेत्री पूजा सावंत, तसेच नेहा महाजन या कलाकारांनीही उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमामध्ये नृत्य संगीताचा समावेश होता. पुण्याच्या इनॉर्बिट मॉलमध्ये बरेचं प्रेक्षक सहभागी झाले आणि लोकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी आतापर्यंत विविध शैलीच्या चित्रपटांची रचना केली आहे. या अष्टपैलू दिग्दर्शकाने स्वातंत्र्य संग्रामाच्या ज्वलंत पार्श्वभूमीवर जीवनमूल्यांचा लेखाझोखा मांडणारी एक प्रेम कथा रचली आहे. मातृभूमीच्या प्रेमाखातर आपल्या प्रेमाचा बळी देणाऱ्या प्रेमवीराचा संघर्ष ओंकार गोवर्धन या कलाकाराने उत्तम साकारला आहे. त्याशिवाय विक्रम गोखले, किशोर कदम, राहुल सोलापूरकर आणि मंगेश देसाई यांच्या ही महत्वाच्या भूमिका आहेत. अक्षर फिल्म्स लिमिटेड प्रस्तुत निळकंठ मास्तर या चित्रपटाची निर्मिती मेघमाला बलभीम पठारे यांनी केली  आहे. ‘आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा हा चित्रपट’ असल्याचं गजेंद्र अहिरे यांनी म्हटलं आहे. काळाचा गोडवा असलेली मधुरगीते, ही चित्रपटाची गरज ओळखून अजय अतुल ह्या प्रयोगशील लोकप्रिय संगीतकारांनी कर्णमधूर गाणी  तयार केली. निळकंठ मास्तर हा चित्रपट येत्या  ७ ऑगस्ट ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
nilkanth-master1

What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
political parties candidates celebrated rang panchami
रंग जल्लोष रामाचा अन् प्रणितीचा..
country has to be saved from leftist thinkers says All India Member of RSS Suresh Soni
“डाव्या विचारवंतांपासून देशाला वाचवावे लागेल, अन्यथा हे लोक…” संघाचे अखिल भारतीय सदस्य सुरेश सोनी यांचा इशारा
rupali chakankar jitendra awhad
“रुपाली चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते”, सुप्रिया सुळेंवरील ‘त्या’ टीकेला आव्हाडांचं उत्तर; म्हणाले, “बुरसटलेले विचार…”