बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील देसी लूकनंतर आगामी ‘ब्रदर्स’ चित्रपटात अभिनेत्री करीना कपूरचा एका ‘आयटम साँग’मध्ये बोल्ड अवतार पहायला मिळणार आहे. अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या भूमिका असलेल्या ‘ब्रदर्स’ चित्रपटात करीना कपूर ‘मेरा नाम मेरी’ नावाचा आयटम नंबर पेश करणार आहे. या आयटम साँगचा टीझर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे, या गाण्याला मराठमोळे संगीतकार बंधू अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. ‘जत्रा’ या मराठी चित्रपटातील ‘ये गो ये मैना’ या गाजलेल्या गाण्याच्या संगीताचा तडका अजय-अतुल यांनी ‘मेरा नाम मॅरी’ गाण्याला दिला आहे.
दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी ब्रदर्स हा चित्रपट प्रदर्शित होणार असून २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘वॉरियर’ या हॉलीवूडपटाचा हा रिमेक आहे.