‘एबीसीडी २’ या आगामी चित्रपटात दिसणारी अभिनेत्री श्रध्दा कपूरला नृत्याच्या सरावादरम्यान दुखापत झाली. २०१३ साली आलेल्या ‘एबीसीडी’ चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या या चित्रपटात ती एका नर्तिकेची व्यक्तिरेखा साकारत आहे. नृत्यातील स्प्लिट’ नावाचा प्रकार करत असताना तिच्या स्नायुमध्ये ताण निर्माण झाला. ती म्हणाली, माझ्यातील अतिउत्साहाचे हे फळ असून, त्यामुळेच माझ्या स्नायुवर ताण पडला. इथून पुढे सरावादरम्यान मला जास्त काळजी घेण्याची गरज आहे. तुमची शरिरीक क्षमता जाणणे महत्वाचे असून, प्रयत्नांच्या पराकाष्ठेची सिमारेषा जाणणेदेखील तितकेच गरजेचे आहे. असे असले तरी, मला नृत्याची खूप आवड असल्यामुळे माझे हे दुखणे लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करते. प्रसिध्द कोरिओग्राफर रेमो डिसुझा दिग्दर्शित या चित्रपटात श्रध्दा कपूरबरोबर वरुण धवन काम करत आहे.
(छाया सौजन्य – टि्वटर)