तानसा जलवाहिनीचे काम हाती घेण्यात येत असल्याने दादर, प्रभादेवी तसेच अंधेरी पूर्व येथे ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. महापालिकेकडून १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम ३१ ऑक्टोबर रोजी हाती घेण्यात आले आहे. यादिवशी मरोळ बस मार्ग, अंधेरी-कुर्ला मार्ग, जे. बी. नगर, ओम नगर, कोंडीविटा, पश्चिम द्रुतगती मार्ग, तरूण भारत, सहार मार्ग, अंधेरी रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसर, मोगरा गावठाण, मरोळ-मरोशी मार्ग ते मिलीटरी मार्ग, सेव्हन हिल अंधेरी पूर्व, प्रभादेवी, सिद्धीविनायक मंदिर परिसर, डिलाइल रोड, सेनापटी बापट मार्ग, पोर्तुगीज चर्च, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, आगाशे पथ याठिकाणी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत २० टक्के पाणीकपात असेल.