‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’च्या निमित्ताने आयोजित मोफत गुंतवणूक मार्गदर्शनाला ठाणेकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्यानंतर आता मुंबईकरांसाठीही अर्थजागराचा कार्यक्रम होणार आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात मंगळवार, ३१ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता गुंतवणूकतज्ज्ञ मुंबईकरांना सरकारी योजना-भांडवली बाजारांतील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करतील. तसेच करसवलतीच्या उपायांचीही चर्चा होईल.