मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या विकास खारगे यांची बृहन्मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खारगे यांनी नव्या पदाचा कार्यभार बुधवारी स्वीकारला.
या वेळी पालिका प्रशासनाच्या वतीने महापालिका उपायुक्त सुधीर नाईक, किरण आचरेकर यांच्यासह इतर अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
मुंबई महापालिकेत अतिरीक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा नुकतीच करण्यात आल्याचे सूत्रांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.