भीमाशंकर येथे माळीण गावावर डोंगरकडा कोसळ्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील चेंबूरमध्ये गुरूवारी सकाळी दरड कोसळून एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चेंबूरमधील अशोक नगर परिसरात सकाळी आठच्या सुमारास अचानक दरड कोसळली. यामध्ये गणेशकुमार कु-हाडे हा पाचवर्षीय चिमुकला मातीच्या ढिगाऱयाखाली सापडून गंभीररित्या जखमी झाला. उपस्थितांनी त्वरित गणेशकुमारला कुर्ला येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते परंतु, गंभीररित्या जखमी झाल्याने त्याची प्रकृती चिंताजन होती आणि उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बुधवारी माळीण गावावर डोंगरकडा कोसळल्याने गावातील ४५ घरे गाडली गेली आहेत. घटनास्थळावर एनडीआरएफचे जवान शर्थीचे प्रयत्न करून मदतकार्य करत आहेत आणि माळीणमधील दुर्घटनेला २४ तास देखील उलटले नसताना चेंबूरमध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.