दरवर्षी पावसाच्या तडाख्याने मुंबईची ‘लाईफलाईन’ लोकलसेवा रखडण्याचे रडगाणे हे मुंबईकरांसाठी नवीन नाही परंतु, ‘मुंबई मेट्रो’नेही आता मुंबईकरांना रखडवण्यास सुरूवात करून पुरता भ्रमनिरास केला आहे.
मुंबईत सध्या पावसाचे धुमशान सुरू आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत सिग्नलमधील तांत्रिक बिघाडामुळे मुंबईची लोकल खोळंबल्याचे मुंबईकरांनी अनुभवले होते त्यात गुरूवारी मुंबई मेट्रोचीही भर पडली. मुंबई मेट्रोच्या एअरपोर्ट रोड ते असल्फा स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मेट्रोसेवा तब्बल २० ते २५ मिनिटे उशीराने सुरू आहे.
व्हिडिओ…जेव्हा पहिल्या पावसात मेट्रोही गळायला लागते!
त्यामुळे मुंबई लोकलच्या रडगाण्याचा कित्ता गिरवत आता मुंबई मेट्रोनेही मुंबईकरांची पुरती निराशा करण्यास सुरूवात केली आहे. याआधीही पहिल्या पावसातच मेट्रोच्या छताला गळती लागल्याचा प्रकार उघडकीस आला होता.