पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या गावाच्या पुनर्वसनासाठी आता मदतीचे हात सरसारवले आहेत. मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिर न्यासाने माळीण गावाच्या पुर्नवसनासाठी ५० लाखांची मदत जाहीर केली आहे.
फोटो गॅलरी: पत्ता शब्दश: मातिमोल झाला!
तसेच या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत बुधवारीच जाहीर केली आहे. माळीण गावावर दरड कोसळल्याने गावातील तब्बल ४६ घरे मातीच्या ढिगाऱयाखाली पूर्णत: गाडली गेली आहेत. सध्या घटनास्थळी वेगाने मदत कार्य सुरू असून जेसीपीद्वारे तेथील माती उपसली जात आहे परंतु, या दुर्घटनेत जवळपास संपूर्ण गावच निस्तनाभूत झाल्याने गावाचे पुर्नवसन करावे लागणार आहे. त्यामुळे समाजाप्रतीचे आपले दातृत्व लक्षात घेता सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून गावाच्या पुनर्वसनासाठी मदत जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
माळीण दुर्घटनेतील आठ जणांना वाचवण्यात यश