महिला सक्षमीकरणाच्या जोरदार बाता मारणाऱ्या राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत मात्र महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतला होता. मात्र निवडणूक लढविलेलया २७६ महिला उमेदवारांपैकी विधानसभेच प्रवेश करण्याची १५ महिलांना संधी मिळाली आहे. गेल्या विधानसभेत  ११ महिला आमदार होते. त्यातूलनेत आता महिला आमदारांची संख्या वाढली असून त्यात भाजपच्या सर्वाधिक ७ महिला आमदारांचा समावेश आहे.  विद्यमान  माजी मंत्री वर्षां गायकवाड, आमदार पंकजा मुंडे, यशोमती ठाकूर,  माधुरी मिसाळ, प्रणिती शिंदे, निर्मला गावीत आणि संध्यादेवी कुपेकर पुन्हा एकदा विधानसभेची लॉटरी लागली आहे. तर मिनाक्षी पाटील, मिरा रेंगे-पाटील या विधानसभेत दिसणार नाहीत.
 विधानभेची निवडणूक लढविलेल्या ४ हजार ११९ उमेदवारांपैकी २२७ महिला उमेदवार  होते.  भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, मनसे या पाचही प्रमुख राजकीय पक्षांनी ८७ महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. काँग्रेसने सर्वाधिक २७ महिलांना तिकीट दिले. त्यातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता (भोकर), माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती (सोलापूर मध्य), माजी मंत्री वर्षां गायकवाड (धारावी), निर्मला गावीत (इगतपुरी),यशोमती ठाकूर (तिवसा) विजयी झाल्या आहेत. तर शीतल म्हात्रे (दहिसर), राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शहा (मलबार हिल), अ‍ॅनी शेखर यांना पराभव पत्करावा लागला. भाजपने २१ महिलांना उमेदवारी दिली होती. त्यातून मंदा म्हात्रे (बेलापूर), मनिषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), डॉ. भारती लव्हेकर (वर्सोवा), पंकजा मुंडे (परळी), माधुरी मिसाळ (पर्वती-पुणे), मोनिका राजीव राजळे (शेवगाव) निवडूण आल्या. तर राष्ट्रवादीने काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरविलेल्या १६ महिलांपैकी दिपीका चव्हाण (बागलन), संध्यादिनी कुपेकर (चंदगड), ज्योती कलानी (उल्हासनगर) विजयी झाल्या. मनसेच्या १३ तर शिवसेनेच्या १० महिला उमेदवारांपैकी एकीलाही विजय मिळविता आलेला नाही.
राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची अनामत जप्त !
मुंबई : गेली १५ वर्षे सत्तेत भागीदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. त्याच वेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नामसाधम्र्य असलेला पक्षाच्या चांदिवली मतदारसंघातील उमेदवाराला अनामत रक्कमही वाचविता आली नाही. १० हजारांपेक्षा कमी मते मिळालेले शरद पवार हे पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. याआधी महापालिका निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. म्हणजेच या शरद पवार यांच्या पराभवाची मालिकाच सुरू झाली आहे.

 

sattakaran, raigad lok sabha seat, mahayuti, maha vikas aghadi, candidates, dependent on alliance parties, win the seat, marathi news, raigad news, lok sabha seat 2024, election 2024, anant geete, shunil tatkare, shekap, congress, bjp, ncp, shivsena,
रायगडात मित्रपक्षांवर दोन्ही प्रमुख उमेदवारांची मदार
Why did Sunetra Pawar say The relationship will improve after the election
सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल
Women Voters in India
निवडणूक आयोगाने ‘तो’ कठोर निर्णय घेतला आणि महिला मतदारांची संख्या वाढली
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?