गुरुवारी उपनगरांमध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी दक्षिण मुंबईत तसेच कोकण परिसरात पावसाने चांगलीच आघाडी उघडली होती. वेधशाळेने गुरुवारी नोंदवलेल्या अंदाजानुसार शुक्रवार व शनिवारीही मुसळधार पावसाच्या सरी सुरूच
राहणार आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा जोर वाढला आहे. मान्सूनने राज्याच्या सर्व भागात प्रवेश केला असून मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागातही पावसाने हजेरी लावली.