बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्यमंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सोमवारी दिली. बारावी आणि दहावीच्या निकालाच्या तारखांबाबत पसरलेल्या अफवांमुळे विद्यार्थी आणि पालक अस्वस्थ झाले होते. मात्र मंडळाने अखेर निकालाची तारीख जाहीर केली. विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप ४ जूनला दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे. या वर्षी राज्यातून या परीक्षेसाठी साधारण १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थी बसले होते. राज्यातील २ हजार ३८९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.

येथे निकाल पाहा..
http://www.mahresult.nic.in
http://www.maharashtraeducation.com
http://www.hscresult.mkcl.org
http://www.rediff.com/exams