बालाजीच्या दर्शनासाठी स्कॉर्पिओ मोटारीने निघालेल्या बारामती तालुक्यातील तरुणांच्या मोटारीला आंध्र प्रदेशमध्ये अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील करनुल-चित्तुर महामार्गावरील पेडाबोदनम गावाजवळ पाहटे तीनच्या सुमारास अपघात झाला.

सागर अंकुश रसाळ, सागर बाळासाहेब रसाळ, अजित रामचंद्र रसाळ (रा. देऊळगाव), अनिल सत्यवान गवळी, शेखर बापुराव गवळी, हृषीकेश पोपट गवळी आणि गणेश बाळासाहेब खराडे (रा. उंडवडी सुपे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण पंचवीस ते तीस वयोगटातील होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे आणि देऊळगाव रसाळ या गावातील सात तरुण तिरूपतीच्या बालाजीच्या दर्शनासाठी स्कॉíपओ मोटारीने रविवारी गेले होते. मोटारीने सोमवारी अडीचच्या सुमारास पेडाबोदमन गावाजवळ एका घराला धडक दिल्याने सात जणांचा मृत्यू झाला. चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. पाच जण जागीच ठार झाले. तर दोघांचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे.