‘थैल्यांची हंडी..’ हे अन्वयार्थ सदरातील स्फुट (३० जुलै) वाचले. दहीहंडी उत्सवावरच बहिष्कार घालण्याचा गोिवदा पथकांचा इशारा म्हणजे राज्य सरकारला वेठीला धरण्याचाच प्रकार आहे, असे मुळीच नाही. उत्सवावर बहिष्कार घालण्याने वेठीला धरले जाईल ते सरकार नव्हे, तर या उत्सवाचे आयोजक, याला पसा पुरवणारे धनदांडगे आणि त्याला बळी पडणारे स्वत: गोिवदा. हे लवकरच संबंधितांच्या लक्षात आले आहे आणि त्यांनी आता उत्सवावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा बदलून सरकारच्या निर्णयावरच बहिष्कार टाकू, असा उद्दाम इशारा दिला आहे.
पूर्वी राजे-महाराजे, संस्थानिक आणि रईसजादे लोक कोंबडय़ांना दाणे टाकून त्यांच्या लढतीचा खेळ स्वत:च्या मनोरंजनासाठी, जुगारासाठी आणि बडेजावासाठी खेळत असत. गोिवदाचे सध्याचे ‘इव्हेंटीकरण’ हा त्याच प्रकाराचा आधुनिक आणि अधिक अमानुष प्रकार आहे. खेळाच्या नावाखाली गरीब तरुणांना मोठमोठय़ा रकमेचे आमिष दाखवून जिवावर उदार व्हायला भाग पडून स्वत:चे मनोरंजन, प्रतिष्ठा, प्रसिद्धी साध्य करण्याचा हा पुंजीपती आयोजक आणि राजकारणी यांचा खेळ आहे. निवडणुकीची पूर्वतयारी हे उद्दिष्टही यातून साधले जाते. शारीरिक कौशल्याचे प्रदर्शन आणि रोखीकरण करण्यासाठी इतर अनेक पर्याय आहेत. गोिवदाच्या या विकृत स्वरूपापेक्षा रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारा, आधी खेळ दाखवून नंतर थाळी फिरवणारा डोंबारी अधिक प्रामाणिक असतो.
शासनाने या प्रकरणात कडक धोरण स्वीकारण्याची गरज आहे. दहीहंडीला पसे लावण्यास किंवा तसे बक्षीस जाहीर करण्यावर सरसकट बंदी घालावी. गोिवदाच्या वयाबरोबरच दहीहंडीच्या उंचीवरही नियंत्रण असणारे कायदे आणि त्याची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीचे बाजारीकरण करण्याचा अट्टहास सोडला तरच आपले उत्सव निखळ आनंददायी होऊ शकतील.

टगेगिरी गृहमंत्र्यांनी तरी थांबवावी
दहीहंडीबाबत ‘समन्वय समिती’ची बालिश भूमिका वाचून त्यांच्या आकलनशक्तीची कीव येते. प्रश्न पडतो, यांचा बोलवता धनी कोण? यांची बुद्धी की गावगल्लीतील तथाकथित प्रादेशिक (राडेबाज) राजकीय पक्ष? कोवळ्या वयात मुलांची सुरक्षितता महत्त्वाची की भाषिक-सांस्कृतिक अस्मिता महत्त्वाची?
मराठी तरुणांना उद्योगधंद्यात, शेअरमार्केट, माहिती तंत्रज्ञानात अग्रेसर बनवण्यात प्रोत्साहन देण्याचे बाजूला ठेवून हे राडेबाज पक्ष व त्यांचे नगरसेवक २५ लाखांसारखी बक्षिसे ठेवून दहीहंडी, गणपती उत्सव वगरेंसारखे कार्यक्रम राबवून स्वत:चा राजकीय पाया तयार करत असतात, हे सत्य आहे. कारण हीच मुले फेकलेले पसे बक्षीसरूपाने घेऊन तरुणपणी याच टग्या राजकीय पक्षांच्या वळचणीला जातात आणि स्वत:ला कार्यकत्रे म्हणवून राडेबाजी करून बंद यशस्वी करण्यात हातभार लावत असतात.
किमान गृहमंत्र्यांनी (त्यांची पक्षीय भूमिका बाजूला ठेवून) तरी या स्वघोषित समन्वय समित्यांना धूप न घालता लहान मुलांचे शारीरिक आणि मानसिक नुकसान होऊन त्यांच्या नावावर राजकारण होणार नाही याची दखल घ्यावी आणि या टग्या प्रवृत्तींना पायबंद घालावा.
अंकुश मेस्त्री

सिलोनप्रश्नी केंद्रीय मंत्री मध्यस्थी करतील?
‘सिलोनमध्ये सोन्याच्या विटा’ हे वृत्त ( रविवार वृत्तान्त, २७ जुलै) वाचले. अनिरुद्ध भातखंडे यांनी केवळ भारतातील नव्हे तर पाकिस्तान, मध्य पूर्वेतील देश, अमेरिका, कॅनडा येथील तमाम ‘सिलोन’प्रेमींवरील अन्यायाला वाचा फोडली आहे. संध्याकाळचे प्रसारण बंद करताना व सकाळच्या प्रसारणाचा कालावधी कमी करताना ‘श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ने (एसएलबीसी) महसुलाचे कारण पुढे केले आहे, मात्र एसएलबीसीची अन्य पाच-सहा भाषांमधील केंद्रे सुखेनैव सुरू असल्याने भाषक आकसापोटीच हिंदी चित्रपटगीतांवर गदा येत आहे, या शंकेला जागा आहे. जगभरातील लाखो श्रोते गेली सहा दशके ही अवीट गाणी नित्यनेमाने ऐकत असून ही श्रवणभक्ती अनेकांसाठी रोजचे टॉनिक आहे. केंद्र सरकारने श्रीलंकेशी तातडीने बोलणी करून रेडिओ सिलोनच्या हिंदी विभागाला गतवैभव मिळवून द्यावे, अशी ‘सिलोन’प्रेमींची कळकळीची विनंती आहे.
सी. विजयकुमार, खांदेश्वर, नवी मुंबई</strong>

पुन्हा केवळ गरसमज!
डॉ. प्रशांत बागड यांनी ‘तत्त्वभान’ या सदरातील ‘सौंदर्यशास्त्र.. केवळ गरसमज’ (१७ जुल) या माझ्या लेखनातील चुका. हे अर्थातच त्यांनी ज्ञानाचे प्रेमिक (फिलॉसॉफर) म्हणून केले आहे, म्हणून त्यांचे आभार.
सौंदर्यशास्त्राची नेमकी व्याख्या नेमक्या कोणत्या यथार्थ शब्दांमध्ये करावी, कोणता शब्द इतर कोणत्या शब्दाला समांतर मानावा किंवा जो कुणी असे काही मांडतो, त्याचे म्हणणे का मानावे, हे तत्सम वाद प्राचीन आहेत. बागड कांटची व्याख्या पुढे आणतात, पण अशा शेकडो व्याख्या आहेत. (दिवंगत) प्रा. श्री. व्यं. बोकील यास लालित्यमीमांसा म्हणत. सुरेंद्र बारलिंगे- विवेक गोखले हे मर्ढेकरांपासून सौंदर्यशास्त्र सुरू होते म्हणतात. (दिवंगत) दिलीप चित्रे कलासमीक्षा, सौंदर्यशास्त्र  आणि कलेचे तत्त्वज्ञान या तिघांना वेगळे करतात. एल्लू८ू’स्र्ंी्िरं ऋ ई२३ँी३्रू२ (सं. मायकेल केली, १९९८) नुसार ‘कला, निसर्ग आणि जग यावरील विवेचक चिंतन म्हणजे  सौंदर्यशास्त्र’.
आता, पहिले, या संकल्पना, व्याख्या किती जणांना मान्य होतील? एखादीच आवडलेली व्याख्या पुढे दामटणे, हा मूरच्या मते तर्कदोष आहे. ‘ब्लॅक इज ब्युटीफूल’चा दावा करणारे आफ्रिकन-अमेरिकन काळे किंवा भारतीय दलित साहित्यिक या असल्या व्याख्या विस्कटून-फेकाटून देतात. त्यांच्या मते, ‘वेदना आणि विद्रोह याची साहित्यिक जाणीव हेच सौंदर्यशास्त्र!’ त्यामुळे हे चुकीचे विधान आणि ते बरोबर विधान असे विधान करता येत नाही. मुळात चूक नावाची गोष्ट अस्तित्वात नसते आणि बरोबर नावाची गोष्ट त्रिकालाबाधित नसते, असे प्रो. सुरेंद्र बारिलगे म्हणत असत. सौंदर्यशास्त्र जन्मापासून कसं जटिल, गुंतागुंतीचं राहिलं आहे, हे मराठीत बोकील, बारिलगे, रेगे, दि. य. देशपांडे, पाटणकर, पाध्ये इत्यादींनी दाखवून दिले आहे. ते मी फक्त अधोरेखित करीत आहे.
दुसरे, बागड बाऊमगार्टेनची माहिती देतात, पण त्याआधी अँथनी अॅशले कूपर (१६७१-१७१३) या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याने नतिक सौंदर्य ही संकल्पना मांडून सौंदर्यशास्त्राचा पाया रचला, याकडे दुर्लक्ष करतात. बाऊमगार्टेनचे महत्त्वाचे काम म्हणजे त्याने नीतिशास्त्र व सौंदर्यशास्त्र वेगळे केले.
तिसरे, सौंदर्यशास्त्राचे मूळ तत्त्वज्ञानात असताना ते मराठी समीक्षेची मिरासदारी कशी बनली, हे ‘तत्त्वभान’ या सदराचा लेखक म्हणून मी काहीच ठरवीत नाही; फक्त अधोरेखित करीत आहे. ही मिरासदारी (साठोत्तरी) मराठी समीक्षकांनी आधीच निर्माण केली आहे.
‘रा. भा. पाटणकर यांनी मराठीत लेखन केल्याचे वाचून ‘तत्त्वभान’चा लेखक पार भांबावून जाणार, यात शंकाच नाही’ अशी बागड यांनी खात्री दिली आहे. माझ्या मनात काय घडणार, हे या आधुनिक पतंजलींनी सांगून टाकले! पण या लेखात पाचव्या परिच्छेदात पाटणकर यांचे मत मी स्पष्टपणे नोंदविले आहे. शिवाय शेवटच्या तीन परिच्छेदांत मी संस्कृत आणि मराठी लेखकांची नवे दिली आहेत, त्यातही पाटणकर आहेतच. उलट काहीशा अनवधानाने व मुख्यत: जागेअभावी व न. चिं. केळकर, श्री. कृ. कोल्हटकर, श्री. ना. चाफेकर, द.के. केळकर, माधवराव पटवर्धन, साने गुरुजी, रा. भि. जोशी, गं. त्र्यं. देशपांडे,  रा. श्री. जोग, डॉ. के. ना. वाटवे, प्रभाकर पाध्ये, वि. ना. ढवळे,  डॉ. स.गं. मालशे, कमलाकर दीक्षित, दिलीप चित्रे, अशोक दा. रानडे, आर. पी. कंगम, प्रा. इन. आर. दुंडगेकर, नरहर कुरुंदकर, श्री. व्यं. बोकील, भा. ज. कवीमंडन, सुधीर रसाळ, वि.रा. करंदीकर, सु. रा. चुनेकर, प्रा. म. सु. पाटील, डॉ. मििलद मालशे, रवींद्र किंबहुने, सतीश बहादूर, गो. पु. देशपांडे, डॉ. श्रीराम गुंदेकर, आनंद पाटील, डॉ. विवेक गोखले, डॉ. शरणकुमार िलबाळे अशी अनेक नावे राहिली आहेत.
देरिदा आणि मंडळींचा उल्लेख मी ‘जाता जाता’ केला नसून वृत्तपत्राच्या सदराची मर्यादा, वाचक वर्ग लक्षात घेऊन केवळ उल्लेख पुरेसा होतो. जिज्ञासूंनी तज्ज्ञांकडून ज्ञान मिळवावे, अशी या लेखनात अपेक्षा असते. माध्यमे, वृत्तपत्र हे केवळ दवंडी देण्याचे काम करते.
चौथे, ‘‘इस्थेटिक्स.. असे शब्द शोधयंत्राला दिले की, ते सुगंधी पावडरी, तेले.. इत्यादी सौंदर्यप्रसाधनांची ‘स्थळे’ दाखविते.’’ मी केलेली ही बाष्कळ कोटी नसून ती लोकांनी केली आहे. मी ते फक्त दाखविले आहे. आता ‘सॅमसंग’ कंपनीने मोबाइल दुरुस्तीच्या कलमांच्या यादीत scratches of aesthetics/body असे कलम घातले आहे. हे काय मी केले? आता, हा भोंगळपणा, गचाळपणा दाखविण्यातून माझे मराठी समीक्षेने न डागाळलेले, तत्त्वज्ञानावरचे अव्यभिचारी प्रेम कसे काय उघड होते?
बागड यांचेही गरसमज व्हावेत, हे या ज्ञानशाखेचे यश आहे. माझ्या लेखाचे नाही.
श्रीनिवास हेमाडे, अहमदनगर</strong>