इन फोकस
कोणतीही गोष्ट अगदी ठासून सांगायची असेल तर ‘ढोल बडविणे’ असे म्हणतात. आपल्याकडचे सण आणि उत्सवांचे तर या वाद्यावाचून पानही हलत नाही. श्रावण महिन्यात विविध ठिकाणांहून पारंपरिक ढोल, ढोलकी वाजविणारी मंडळी शहरांमध्ये येतात. ढोलकी हे मिरवणुकांचा अविभाज्य घटक आहेत. कोणत्याही लहान-मोठय़ा मिरवणुकांमध्ये लहान-मोठे ढोल, ढोलकी असतातच. आपल्याकडे गणेशोत्सव काळात सर्वाधिक मिरवणुका निघतात. साहजिकच या काळात ढोल पथकांना खूप मागणी असते. हल्ली सार्वजनिक उत्सवांप्रमाणेच घरगुती गणेशाच्या आगमनाप्रीत्यर्थ मिरवणुका काढल्या जातात. त्यामुळेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून ढोल वाजविणारी मंडळी शहरात येत असतात.