ठाणे शहरातील घोडबंदर रोड, रेमण्ड कंपनी, वर्तकनगर परिसरात सध्या सापांचा सुळसुळाट सुरू आहे. दिवसाआड येथे एखादा साप सापडतोच. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाण्यातील हा विभाग वन विभागाजवळ असल्याने सापांचा वावर वाढल्याची चर्चा सुरू होती. त्यांना सापांच्या सुळसुळाटाचे खरे कारण सापडले आहे, ते म्हणजे शहरातील वाढता कचरा. कचरा वाढल्याने शहरात उंदरांचे प्रमाण वाढले असून, उंदीर हे मुख्य भक्ष्य असल्याने त्यांच्या मागावर असलेले साप थेट शहरात घुसू लागले आहे. त्यामुळे वाढता कचरा हाच आपल्यासाठी जीवघेणा ठरत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्पन्न वाढले की, कचरा वाढतो.
त्यामुळे सध्या शहरामध्ये प्रचंड कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेकदा स्वच्छता खात्याने नियमावली सादर केली, पण त्याकडे महानगरपालिकांनी दुर्लक्ष केले आहे.  पावसाळ्यामध्ये कचरा ओला झाल्याने तो पटकन कुजतो. त्यामुळे उंदरांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. उंदरांची प्रजननशक्ती अधिक आहे. एक उंदरापासून दरवर्षी आठशेहून अधिक उंदरांची पैदास होते. सापांचे घाणेंद्रिय अधिक तीक्ष्ण असते. उंदरांच्या वासाने ते कचऱ्याकडे पर्यायाने शहराकडे धाव घेतात, अशी माहिती ‘अ‍ॅनिमल हेल्थ केअर’ संस्थेचे पराग शिंदे यांनी दिली. या संदर्भात मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रश्न वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले.

tv04ठाण्यात आढळून येणाऱ्या सापांमध्ये हरणटोळ, घोणस, फुरसे, कोवळा मणियार आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. 

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Expansion of manufacturing companies in 14 cities due to spiritual tourism
आध्यात्मिक पर्यटनामुळे १४ शहरांत उत्पादक कंपन्यांचा विस्तार
survey has revealed that 15 percent of the houses in the city do not even have a sight of sparrows
१५ टक्के घरांमधून चिमण्यांचे दर्शन दुर्लभ… काय सांगतोय अकोल्यातील सर्वेक्षणाचा निष्कर्ष?

शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शहरी गरिबांची एक अदृश्य फौज काम करते. वाढत्या कचऱ्यामुळे उंदीर वाढतात, त्यामुळे कचरा वेचणारे आणि सामान्य नागरिक यांचा जीव धोक्यात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
– पराग शिंदे,
‘अ‍ॅनिमल हेल्थ केअर’