scorecardresearch
  • Lokankika 2022

लोकांकिका – पेज टू स्टेज

लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत सहभागी झालेल्या महाविद्यालयांनी आपल्या एकांकिकेची निर्मितीप्रक्रिया, तालमींतल्या गमतीजमती, फोटो, इम्प्रोव्हायझेशन्सच्या चित्रफिती, एकांकिकेतील आशय, विषय, सादरीकरणासंदर्भातील पोस्टर्स, एकांकिकेची जाहिरात, थोडक्यात- रंगमंचामागील घडामोडी  डिजिटल माध्यमातून मांडण्याची आणि आकर्षक बक्षीस मिळवण्याची संधी.

  • प्रत्येक कॉलेजने प्लेस्टोअरवरून ‘टुगेदरिंग’ (Togethring) अ‍ॅप डाऊनलोड करावे
  • त्यावर आपले एक पान (पेज) तयार करावे
  • त्यावर एकांकिकेशी संबंधित ‘साहित्य’ (कन्टेन्ट) पोस्ट करावा
  • टुगेदरिंग अ‍ॅपवरील या स्पर्धेचे परीक्षण संबंधित ‘कन्टेन्ट’ पाहणारे दर्शक व विद्यार्थी यांच्या मतांनुसार होईल
  • मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर अशा आठही केंद्रांवर ही डिजिटल ‘पेज टू स्टेज’ पुरस्कार स्पर्धा होईल
  • प्रत्येक केंद्रांवर सर्वाधिक मते मिळवणाऱ्या विजेत्या एकांकिकेला विभागीय अंतिम फेरीनंतर ‘लोकसत्ता लोकांकिका… पेज टू स्टेज पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.
  • प्राथमिक फेरी सुरू झाल्यावर ‘पेज टू स्टेज पुरस्कारा’साठी संबंधित कॉलेजच्या पेजच्या दर्शकांकडून मतदानास सुरुवात होईल आणि त्या- त्या केंद्रावरील विभागीय अंतिम फेरी संपेपर्यंत मतदान सुरू राहील.
  • विभागीय अंतिम फेरी पाहावयास आलेले प्रेक्षकही मतदान करू शकतील.
  • आठ केंद्रांमधील विभागीय अंतिम फेरीपर्यंत सर्वाधिक मते मिळवणाऱ्या महाविद्यालयाला महाअंतिम फेरीच्या वेळी खास पुरस्कार देण्यात येईल.
  • त्यासाठी पुन्हा नव्याने स्पर्धा होईल
  • दोन्ही फेऱ्यांमध्ये मिळून सर्वाधिक मते मिळवणाऱ्या एकांकिकेस ‘लोकसत्ता लोकांकिका- पेज टू स्टेज महाअंतिम पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल. तीन हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी या स्वरूपातील हा पुरस्कार असेल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय करावे ?

  • प्रत्येक महाविद्यालयाच्या टीम लीडरने ‘टुगेदरिंग’ अ‍ॅप डाऊनलोड करावे.
  • कॉलेजचे नाव- पेज टू स्टेज लोकांकिका’ (College Name – Page to Stage Lokankika) या शीर्षकान्वये हा ग्रुप तयार करावा
  • ‘लोकसत्तालोकांकिका’ (LoksattaLokankika) वर मेसेज पाठवून आपण ग्रुप स्थापन केल्याचे कळवावे.
  • पेज तयार केल्यावर टीम लीडरने आपल्याला सहाय्य करणाऱ्या मित्र, हितचिंतक आदींना या ग्रुपचे सदस्य म्हणून सामील करून घ्यावे.
  • त्यानंतर एकांकिकेसंबंधातील फोटो, व्हिडीओज, साहित्य (कन्टेन्ट), तालमींतल्या गमतीजमती आदी गोष्टी त्यावर शेअर कराव्या
  • मतदान करू इच्छिणाऱ्यांनीही ‘टुगेदरिंग’ अ‍ॅप डाऊनलोड करून ‘लोकांकिका पेज टू स्टेज टी-कॅफे’ (Lokankika Page to Stage T-cafe)वर जाऊन आपल्याला ज्या कॉलेजचे कन्टेन्ट पाहावे आणि आवडलेल्या कन्टेन्टच्या कॉलेजच्या पेजवर जाऊन त्यास मत द्यावे.